Satara News : नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश जारी


शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना 

Satara News : सातारा जिल्ह्यात ऑक्टोबर २०२० मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीबाबत संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना दिले आहेत.

शेतीपिकांच्या नुकसानीबाबत संयुक्त पंचनामे करुन ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीबाबत बाधित शेतकऱ्यांना १३ मे २०१५ च्या शासन निर्णयात विहित केलेल्या दराने मदत देण्यासाठी आवश्यक असलेला एकत्रित प्रस्ताव प्रपत्र अ, ब, क, ड मध्ये अहवाल सादर करावा. 

येणाऱ्या प्रस्तावामध्ये एकाच लाभाथ्र्यासाठी मदतीची द्विरुक्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर करावयाचा असल्याने अहवाल तात्काळ सादर करावा, असेही आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या