Satara News : जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये वशिला, ओळख, दबाव नको



उपचारात गरीबांना प्राधान्य देण्याची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे विनंती

Satara News : सातारा येथील छत्रपती शिवाजी संग्रहालयात शासनातर्फे सुरू होत असलेल्या जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये गरीब आणि सर्वसामान्य रुग्णांना उपचार घेण्यास प्राधान्य द्यावे. वशिला, ओळख, राजकीय वजन, भांडवलदार आणि प्रशासकीय लोकांचे दबाव या गोष्टीला त्या ठिकाणी थारा मिळू नये, अशी विनंती ‘सवयभान’ चळवळीचे राजेंद्र चोरगे व वसंत जोशी यांनी केली आहे.

यासंबंधी चोरगे व जोशी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विनंतीपत्र पाठवले आहे. त्यात म्हटले आहे, की सातारा शहरात नवीन कोविड हॉस्पिटल सुरू होत आहे, ही आनंदाची बाब आहे. तसेच या कोविड हॉस्पिटलमध्ये शासनातर्फे पूर्ण मोफत उपचार केले जाणार आहेत, हीदेखील चांगलीच बाब आहे. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी गरीब व गरजू रूग्णांना प्राधान्य मिळाले पाहिजे. 
प्रशासनाने लक्ष घालून नियमावली ठरवावी

कोणत्याही दबावाला बळी न पडता हे हॉस्पिटल छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला आणि नावाला साजेल असे चालवले पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने या शासकीय योजनेचा फायदा योग्य आणि गरजवंत लोकांना मिळेल.

यासाठी प्रशासनाने जबाबदारीने लक्ष घालून नियमावली ठरवावी. तरच या कोविड हॉस्पिटलसाठी वापरलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचे संग्रहालय खऱ्या अर्थाने उपयोगी ठरेल आणि उद्दिष्ट सफल होईल, असेही पत्रात म्हटले आहे.

Get all live and latest Satara news, Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या