उदयनराजे यांच्यासंदर्भातील बेताल वक्तव्याचे साताऱ्यात पडसाद
Satara News : खासदार उदयनराजे भोसले यांच्या बाबतीत डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी काढलेल्या संतापजनक वक्तव्याचे पडसाद साताऱ्यात उमटले. याविरोधात आज शहरात जोरदार निदर्शने करण्यात आली.
मराठा आरक्षण विषयावरून डॉ. आंबेडकर यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्याविषयी काढलेल्या उद्गारांमुळे साताऱ्यात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. उदयनराजे यांच्यावर प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते चवताळून रस्त्यावर उतरले. त्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.
यावेळी ‘प्रकाश आंबेडकर मुर्दाबाद, एक नेता एक आवाज उदयन महाराज उदयन महाराज, उदयनराजे आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देण्यात आल्या.
...तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही !
प्रकाश आंबेडकर यांची ‘वाचाळवीर’ अशा शब्दात संभावना करण्यात आली. तसेच त्यांनी पुन्हा अशी आगळिक केल्यास महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा कडक इशारा संतप्त कार्यकत्र्यांनी दिला.
प्रकाश आंबेडकर सातारमध्ये कधी येणार आहेत, ते त्यांनी सांगावे. त्यांचे आमच्या पद्धतीने स्वागत करण्यात येईल, असा गर्भित इशाराही यावेळी देण्यात आला.
संपूर्ण जगाचे श्रद्धास्थान असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांबद्दल वक्तव्य करताना प्रकाश आंबेडकर यांनी भान राखायला हवे. प्रकाश आंबेडकर किती विचारवंत आहेत, हे सर्वांनाच माहीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार म्हणून वंचित समाजाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी आजवर किती वंचितांना न्याय दिला हेही सर्वांना माहीत आहे.
उदयनराजे यांनीच वंचितांना न्याय देण्याचे काम केले
याउलट उदयनराजे यांनी कधीही जात-पात, धर्म, पक्ष, गट असा कोणताही भेदभाव न बाळगता त्यांच्याकडे येणाNया प्रत्येक माणसाचे काम मार्गी लावले आहे. प्रकाश आंबेडकर हे त्यांच्याकडे जाणाNया प्रत्येक माणसाला या सर्व बाबींची चौकशी करूनच मदत करतात.
याउलट उदयनराजे यांनी खऱ्या अर्थाने वंचित समाजाला न्याय देण्याचे काम केले आहे, अशी प्रतिक्रिया उदयनराजे समर्थकांनी निदर्शने केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
आंदोलनात सुनील काटकर, माजी नगराध्यक्ष रंजना रावत, संदीपभाऊ शिंदे, बाळासाहेब गोसावी यांच्यासह सातारा विकास आघाडीचे नगरसेवक, राजे प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Get all live and latest Satara news, Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या