शुक्राचार्य भिसे फौंडेशनतर्फे शिवेंद्रराजे यांच्या हस्ते कोरोना योध्यांचा सन्मान
Satara News : कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग हादरुन गेले आहे. अशा या भयंकर महामारीच्या काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडून जनसेवेचा आदर्श घालून देणाऱ्या खऱ्या कोरोना योध्यांना सलाम, अशा शब्दात आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कोरोना योध्यांचा सन्मान केला.
स्व. शुक्राचार्य भिसे सोशल फौंडेशनच्या वतीने कोरोना महामारीत निडरपणे आणि निष्ठेने कर्तव्य बजावणाऱ्या आरोग्य कर्मचारी, पोलीस, शिक्षकांचा आणि कोरोना बाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कोरोना योध्यांचा सन्मान त्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, संदीप शितोळे, फौंडेशनचे अध्यक्ष सचिन कांबळे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते पोलीस कर्मचारी अमित माने, ओंकार यादव, लैलेश फडतरे, स्वप्निल कुंभार, राहुल चव्हाण, वैशाली गुरव, हसन तडवी, पंकज मोहिते, वाहतूक शाखेचे जितेंद्र जाधव, सातारा नगरपालिकेतील आरोग्य कर्मचारी संदीप पाटसुते, कपिल मठ्ठू, अमोल खंडुझोडे, तुकाराम खंडुझोडे, लक्ष्मण कांबळे, विकास जाधव, चंद्रकांत खंडुझोडे, गणेश जाधव, अजय शिंदे, सुनिल गांदले, निसार कच्छी, अक्षय अवघडे, तानाजी वाघमारे, सागर वायदंडे, प्रशांत दोरके, चैतन्य सणस, दीपक भोसले आदिंचा सन्मानपत्र आणि गुलाबपुष्प देवून सन्मान करण्यात आला.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या