रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला बोरगाव पोलिसांनी थरारक पाठलाग करून पकडले
Satara News : बेकायदा देशी रिव्हाँल्व्हर जवळ बाळगल्याप्रकरणी बोरगाव पोलिसांनी सराईत गुन्हेगारास पाठलाग करून पकडले. नागठाणे गावानजीक हॉटेल बाबा पंजाबी धाब्याच्या परिसरात ही घटना घडली. समीर सुनील घोरपडे (वय २२, रा. मत्यापूर, ता. सातारा) असे ताब्यात घेतलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
एक युवक कमरेला रिव्हॉल्व्हर लावून फिरत असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांना मिळाली. यावेळी पोलिसांनी तेथे सापळा रचला. सायंकाळी पाचच्या सुमारास संबंधित युवक त्यांना ढाब्यावर आढळला.
पोलिसांना पाहताच तो युवक तिथून पळून जावू लागला. त्यावेळी पोलिसांनी पाठलाग करून त्याला अटक केली. झडती घेतली असता त्याच्या कमरेला सुमारे ४० हजार रुपये किमतीचे एक देशी रिव्हॉल्व्हर व पाच जिवंत काडतुसे आढळून आली.
बिहारी बाबूकडून घेतला होता कट्टा
पोलीस तपासात त्याचे नाव समीर सुनील घोरपडे असल्याचे निष्पन्न झाले. समीर घोरपडे हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचे वास्तव्य सध्या नागठाण्यात आहे. त्यांने हा देशी कट्टा सुमारे पाच वर्षांपूर्वी एका बिहारी व्यक्तीकडून घेतल्याचे सांगितले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबकर, हवालदार मनोहर सुर्वे, राजू शिखरे, किरण निकम, विशाल जाधव, विजय साळुंखे, प्रकाश वाघ यांनी या कारवाईत सहभाग घेतला. घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार रामचंद्र फरांदे करत आहेत.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या