वाचन संस्कृती जोपासण्यासाठी कार्यक्रम, चर्चासत्रे, प्रशिक्षणही ‘ऑनलाईन’
Satara News : माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा दि. १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. यावर्षीचा वाचन प्रेरणा दिन ऑनलाईन पध्दतीने साजरा केला जाईल, अशी माहिती माध्यमिक उपशिक्षणाधिकारी श्रीकांत जगदाळे यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शाळा बंद आहेत. परंतु शिक्षण ऑनलाईन पध्दतीने सुरू आहे. 'वाचन प्रेरणा दिन' शासनाच्या १४ सप्टेंबर २०२० च्या निर्णयानुसार ऑनलाईन कार्यक्रम, चर्चासत्रे, प्रशिक्षण या पध्दतीने साजरा होणार आहे.
वाचन संस्कृती जोपासण्यासाठी सर्वांनी आपले मित्र, कुटुंबातील सदस्य इत्यादींना १ पुस्तक पीडीएफ स्वरूपात ऑनलाईन पाठवून त्यांना वाचनास प्रोत्साहन द्यावे. तसेच व्हॉटसअप, इंटरनेट, फेसबुक, ट्विटर अशा सामाजिक प्रसार माध्यमातून वाचन संस्कृती वृध्दिंगत होईल, वाचनास प्रेरणा मिळेल असे संदेश प्रसारित करावेत.
मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे
मराठी वाचन संस्कृती जपण्यासाठी सर्वांनी डिजीटल माध्यमांचा जास्तीत जास्त वापर करून साहित्य स्वयंस्फुर्तीने वाचकांना पाठवावे. शैक्षणिक संस्थांनी ऑनलाईन ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करावे, असे आवाहन शासन निर्णयात करण्यात आले आहे.
कार्यक्रम साजरा करताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासन, राज्य शासन यांच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना माध्यमिक शाळांना शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी पत्राद्वारे दिल्या आहेत.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या