Satara News : बेकायदा गावठी पिस्टल बाळगल्याप्रकरणी युवक जेरबंद


चाफळ विभागातील जंगलवाडीत ‘जंगलराज’ असल्याने बाळगत असल्याचा दावा

Satara News : बेकायदा गावठी पिस्टल बाळगल्याप्रकरणी चाफळ विभागातील जंगलवाडी (ता. पाटण) येथील ज्योतीराम उर्फ सागर दत्तात्रय शितोळे (वय २६) या युवकाला पाटण नवीन बसस्थानक परिसरात पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. 

न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गावात विरोधक जास्त असल्याने स्वसंरक्षणासाठी ही पिस्तुल बाळगत असल्याची माहिती त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

बेकायदा पिस्टल घेऊन एक युवक पाटणमध्ये येणार असल्याची गोपनीय माहिती पाटणचे पोलीस उपअधीक्षक अशोक थोरात यांना मिळाली होती. 

त्यांच्या मार्गदर्शनानुसार पाटणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी, पोलीस हवालदार राजेंद्र पगडे, मुकेश मोरे, अजित पवार, उमेश मोरे, प्रशांत माने या पथकाने पाटण येथील नवीन बस स्थानक परिसरात सापळा लावला.

हा युवक हा पाटण येथील नियत बारनजीक सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास आला असता पाटण पोलिसांनी झडप घालून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी गावठी बनावटीच्या पिस्टलसह ३ जिवंत काडतुसे जप्त केली. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या युवकावर यापूर्वी चोरीचे गुन्हे दाखल असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तीन वर्षांपूर्वी बिहारमधील एका व्यक्तीकडून हे पिस्तूल त्याने खरेदी केले होते.  

पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पी. व्ही. पाटील करत आहेत.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या