दक्षता घेण्याचे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे नागरिकांना आवाहन
Satara Weather News : भारतीय हवामान खात्याने १३ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत बहुतेक ठिकाणी वीजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्याप्रमाणे गेल्या दोन - तीन दिवसांपासून सर्वत्र तुफान पाऊस होत असून आणखी तीन दिवस या अतिवृष्टीचा धोका आहे.
या कालावधीत दक्षता बाळगण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे. त्यादृष्टीने लोकांनी कशा पध्दतीने काळजी घ्यावी, काय करावे, काय करू नये याविषयी प्राधिकरणाने काही सूचना जारी केल्या आहेत.
प्राधिकरणाने दिलेल्या सूचना
- नागरिकांनी मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे
- पाऊस पडत असताना, विजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहू नये
- मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रीक वस्तूपासून दूर रहावे
- अतिवृष्टी होत असताना कोणीही नदी नाला इत्यादी ठिकाणी प्रवेश करू नये
- पुराच्या पाण्यात नागरिकांनी सेल्फी काढू नये
- घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा
- अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा
- कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये व अफवा पसरवू नये
- कुठल्याही अशा मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्राकडून करून घ्यावी
वीज पडणार असल्यास आगावू माहिती देणारे अॅप
आपल्या क्षेत्रात वीज पडणार असल्यास DAMINI Lighetening Alert हे अॅप त्याची आगाऊ माहिती देते. तसेच कोसळणाऱ्या विजेपासून संरक्षण करावयाच्या उपाय योजनांची माहिती देते. हे अॅप प्ले स्टोरवरून डाऊनलोड करावे, असेही आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या