विधेयके मागे घेण्याची खटाव तालुका काँग्रेसची निवेदनाद्वारे मागणी
Satara News : केंद्र सरकारने मंजूर केलेली तीन कृषी विधेयके शेतकरी बांधवांसाठी हिताची नाहीत. मुठभर उद्योगपतींना पोसण्यासाठी व शेतकऱ्यांना गिळंकृत करण्यासाठी असलेली ही विधेयके मागे घ्यावीत, अशी मागणी खटाव तालुका काँग्रेसने केली आहे.
काँग्रेसचे जिल्हाघ्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष डॉ. विवेक देशमुख, माजी सभापती अशोकराव गोडसे, मानाजी घाडगे यांनी कार्यकर्त्यांसमवेत जावून तहसिलदार डॉ. अर्चना पाटील यांना याबाबतचे निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे.की, हा कायदा अमलात आल्यास देशातील शेतकरी वर्ग अडचणीत येणार आहे. केंद्र सरकारने विधेयके मंजूर करून बळीराजाला संपविण्याचा घाट घातला आहे. यामुळे कृषी प्रधान देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाल्याशिवाय राहणार नाही.
स्वत: उत्पादित केलेल्या पिकाचा भाव ठरविण्याचा हक्क या कायद्यामुळे राहत नाही. कंत्राटी पद्धतीने नेमलेल्या व अभ्यास नसलेल्या व्यक्तीद्वारे शेतीमालाचा दर निश्चित करण्यात येणार आहे.
अगोदरच अडचणीत सापडलेला शेतकरी यामुळे अधिकच अडचणीत येवून उपासमारीची वेळ येईल, कर्जबाजारी होईल, आत्महत्यांचे प्रमाण वाढेल. म्हणून शेतकऱ्यांची ससेहोलपट थांबविण्यासाठी हे अन्यायकारक कृषी विधेयक रद्द करण्यात यावे.
यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ. महेश गुरव, माजी सरपंच अर्जुनराव गोडसे, मुन्ना मुल्ला, खटाव तालुका सेवा दलाचे अध्यक्ष चंद्रकांत काटकर, तालुका युवक अध्यक्ष सचिन घाडगे, काँग्रेसचे वडूज शहर अध्यक्ष मिहीर गोडसे, उपाध्यक्ष इम्तियाज बागवान, राजू घार्गे, राजेंद्र घाडगे, संतोष भंडारे, हरिभाऊ बनसोडे, पंकज मेहता व कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतकरी व मजदूर बचाव दिवस
महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून आंदोलकांच्या वतीने शेतकरी व मजदूर बचाव दिवस पाळण्यात आला.
राहुल गांधी यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध
हाथरस घटनेतील पीडितांच्या कुटुबीयांना भेटायला जात असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर पोलीस यंत्रणेमार्फत झालेल्या भ्याड हल्ल्याचा खटाव तालुका काँग्रेसच्या वतीने यावेळी जाहीर निषेध करण्यात आला. केंद्र व उत्तर प्रदेश सरकारच्या संकुचित वृत्तीवर यावेळी सडकून टीका करण्यात आली.
Get all live and latest Satara news, Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या