नविन कवठे येथे दोन ऑक्सिजन मशिन्सचे लोकार्पण | Latest Marathi News


गावात एकही रूग्ण नसताना गावाने दाखवलेला द्रष्टेपणा प्रशंसनीय : डॉ. देशमुख

Marathi News...मसूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गावच्या आरोग्यासाठी ऑक्सिजन मशिन घेण्याचे काम मनावर घेवून ते अल्पावधीतच पूर्णत्वास नेण्याचे काम नवीन कवठे (ता. कराड) गावाने केले आहे. गावात अद्याप एकही कोरोनाबाधित रुग्ण नसताना भविष्याचा विचार करुन माणसांचे आयुष्य वाचवण्याचे काम या गावाने केले आहे हे प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन हेळगांव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सतिश देशमुख यांनी केले.

नविन कवठे येथे लोकवर्गणीतून घेतलेल्या दोन ऑक्सिजन मशिनच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कृष्णा सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमन रामचंद्र साळुंखे होते. यावेळी डॉ. विनोद जगदाळे, आरोग्य सहायक टी. डी. सानप, आरोग्यसेवक कल्पक ठमके, पोलीस पाटील मारुती यादव, शाम-शरद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनिलराव पाटील, उपाध्यक्ष दादासाहेब साळुंखे, सयाजी घार्गे, उपसरपंच रवींद्र साळुंखे, प्रताप साळुंखे, चंद्रकांत साळुंखे, सुहास साळुंखे, सुभाष साळुंखे, अविनाश साळुंखे, प्रमोद माने, लालासाहेब शेळके, राजेंद्र साळुंखे, विक्रम साळुंखे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

माणसाची ऑक्सिजन पातळी कमी झाल्यास कठीण परिस्थिती उदभवू शकते. त्यावेळी या मशिन माणसाला हॉस्पिटलमध्ये बेड मिळेपर्यंत तारणहार ठरु शकतील. कोरोनापासून बचावासाठी आपण जर मास्क वापरला तर कोरोना होण्यापासून ९० टक्के स्वत:चा बचाव होऊ शकतो, असे डॉ. विनोद जगदाळे म्हणाले. मास्क लावणे, वारंवार हात धुणे, सामाजिक अंतर राखणे या त्रिसूत्रीप्रमाणे आचरण करणे गरजेचे आहे, असे टी. डी.सानप यांनी यावेळी सांगितले.

ज्ञानेश्वर साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. येथील पदाधिकारी व युवकांनी केलेल्या आवाहनास ग्रामस्थांनी अल्पावधीत दिलेला प्रतिसाद वाखाणण्यासारखा आहे. या मशिनच्या माध्यमातून एखाद्या रुग्णाचे प्राण वाचले तर त्याने दिलेला आशिर्वाद लाखमोलाचा असेल, असे विचार त्यांनी मांडले. सूत्रसंचालन दिलीप माने (सर) यांनी केले. विजयकुमार पाटणकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका, ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या