Satara News : कोयना धरणातून ८ हजार ३५३ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग



धरणाचे दरवाजे 
४ वक्र दरवाजे एक फुटाने उघडले; नदीकाठाला सतर्कतेचा इशारा

Satara News : पाटण / पाटण तालुक्यात तीन दिवसांपासून पावसाचा कहर सुरू असल्यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे पाणी साठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी धरणाचे ४ वक्र दरवाजे मंगळवारी १ फुटाने उघडून ६ हजार २५३ व धरणाच्या पायथा वीजगृहातून वीज निर्मिती करून २ हजार १०० असा एकूण ८ हजार ३५३ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत असल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाने दिली.

राज्यातील विविध विभागात दि. १२ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र पाटण तालुक्यात शनिवार दि. १० पासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. 

कोयना धरणाची पाणीसाठवण क्षमता संपली असल्याने आवक सुरू झाल्यास धरणातून पाणी सोडण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे धरण व्यवस्थापनाने दि. १२ रोजी रात्री ९ वाजता पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून १ हजार ५० क्युसेक्स पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. 

...तर विसर्ग वाढवावा लागणार

त्यात दि. १३ रोजी सकाळी ११ वाजता वाढ करत हा विसर्ग २ हजार १०० क्युसेक्सपर्यंत वाढवण्यात आला. त्यानंतर दुपारी ३.३० वाजता धरणाचे ४ वक्र दरवाजे १ फूट उघडून ६ हजार २५३ व पायथा वीजगृहातून २ हजार १०० असा एकूण ८ हजार ३५३ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे.

कोयना धरणातील सध्याची पाणी पातळी २१६२.११ फूट, ६५९.२५७ मीटर असून पाणीसाठा १०४.४९ टीएमसी आहे. अजूनही पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास विसर्ग वाढवावा लागणार असून नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सावध रहावे, असा इशारा धरण व्यवस्थापनाने दिला आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या