एकतर्फी प्रेमाला प्रतिसाद न मिळाल्याच्या रागातून कृत्य केल्याची कबुली
Satara News : सातारा जिल्ह्यातील तान्ह्या बाळाच्या अपहरण आणि खून प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. याप्रकरणी एका संशयितास अटक करण्यात आली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
एकतर्फी प्रेमातून लहानग्या ओमचे अपहरण करून त्याला क्रूरपणे संपवल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
फलटण तालुक्यातील काळज येथील घरातील पाळण्यात झोपलेल्या ओम अधिक भगत (वय १० महिने) या बाळाचे मंगळवारी (दि. २९) पाचच्या सुमारास २३ ते २५ वर्षाच्या अनोळखी व्यक्तीने अपहरण केल्याचा गुन्हा लोणंद पोलिसात दाखल झाला होता.
या अपहरण नाट्याने संपूर्ण सातारा जिल्ह्याला चक्रावून सोडले होते. पोलीस दलाने ही घटना अत्यंत गांभीर्याने घेत बालकाला व अपहरणकत्र्यांना शोधून काढण्यासाठी १२ पथके तैनात केली होती.
गुरूवारी या अपहरण नाट्याचा शोकान्त झाला. गुरूवारी सकाळी भगत यांच्या घराजवळच असलेल्या विहिरीत फुगून वर आलेला या बाळाचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे कुटुंबीयांसह सर्वांनाच जबर धक्का बसला आणि संतापाची लाट उसळली. त्यावेळी पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान केली आणि त्यांना महत्वाचे धागेदोरे मिळाले.
त्यानुसार याच तालुक्यातील जवळच्या तडवळे येथील संशयिताचे बाळाच्या आईवर एकतर्फी प्रेम होते. परंतु त्याची आई त्याला कसलाही प्रतिसाद देत नव्हती. या रागातून त्याने बाळाचे अपहरण करून त्याला संपवल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
या संशयिताला पोलिसांनी अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेबद्दल संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. दुर्दैवाने बाळाचा जीव वाचला नाही.
पण याप्रकरणी पोलिसांनी हे प्रकरण प्रथमपासूनच अत्यंत गांभीर्याने घेऊन केलेले तपासकार्य, आरोपीला शोधून काढण्यात दाखवलेली तत्परता याची सर्वांनीच दखल घेतली आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या