Satara News : कोयनेतून ३३ हजार ९२१ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग


शेतांमध्ये पाणी घुसल्याने नुकसान; नदीकाठावरील गावांना अतिदक्षतेचा इशारा

Koyna Discharge News : पावसाने पुन्हा जोरदार बॅटिंग सुरू केल्याने कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे साडेतीन फुटांपर्यंत उघडण्यात आले आहेत. धरणातून व धरण पायथा वीजगृहातून कोयना नदीपात्रात ३३ हजार ९२१ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कोयना नदीला पूर आला असून नदीकाठावरील गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. 

हवामान विभागाने वर्तवलेल्या अतिवृष्टीच्या अंदाजाप्रमाणे पाटणसह कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असून जलाशयात प्रतिसेवंâद ३३ हजार ९२१ क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे. 

त्यातच धरणातील पाणीसाठवण क्षमता संपुष्टात आल्याने पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी गुरूवारी पहाटे ४ वाजल्यापासून कोयना धरणाचे ६ वक्र दरवाजे एका फुटावरून साडेतीन फुटाने उचलून तसेच धरण पायथा वीजगृहातून मिळून ३३ हजार ९२१ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान, धरणात आताच्या घडीला १०४.१७ टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ

पाटण तालुक्यात परतीच्या पावसाने जोरदार सुरूवात केली आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून ओढे, नाले, नद्या अगदी ओसंडून वाहू लागल्या आहेत. त्यात कोयना धरणातूनही पाणी सोडले जात असल्याने कोयना नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. नदीच्या काठावरील शेतांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने शेतीचेही अतोनात नुकसान झाले आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या