Satara News : रस्त्यावर सापडलेल्या कासवाला सोडले नैसर्गिक अधिवासात


वन्यजीव सप्ताहात वडूज वनविभागाची कौतुकास्पद कामगिरी

Satara News : सर्वत्र वन्यजीव सप्ताह साजरा केला जात आहे. त्याच काळात खऱ्या अर्थाने हा सप्ताह सार्थकी लावण्याचा सुखद अनुभव वडूजकरांना आला. वडूज वनविभागाने रस्त्यावर सापडलेल्या कासवाला पकडून जीवदान दिले. या कासवाला पुन्हा नैसर्गिक अधिवासान सोडून देण्यात आले. वन्यजीव सप्ताहामध्येच वनविभागाने ही कामगिरी केल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.

आज सकाळी दीपक मोरे हे पेडगाव रोडवरून निघाले असताना त्यांना पेडगाव रस्त्यावर कासव असल्याचे दिसून आले. ही माहिती त्यांनी त्यांचे बंधू डॉ. संतोष मोरे यांना सांगितली. डॉ. मोरे यांनी वनक्षेत्रपाल शीतल फुंदे यांना याबाबत माहिती देऊन कासव ताब्यात घेण्यास सांगितले. 

माहिती मिळताच शीतल फुंदे, वनपाल एस. बी. चव्हाण, हंगामी मजूर महेश पाटोळे हे डॉ. मोरे यांच्यासह घटनास्थळी पोहचले. त्या ठिकाणी असलेले कासव ताब्यात घेऊन ते येरळवाडी येथील धरणातील अधिवासात मुक्त केले. यावेळी वनक्षेत्रपाल फुंदे यांनी वनविभागामध्ये वन्यजीव सप्ताहाचे महत्त्व विशद केले. 

वन्यजीव सप्ताह १ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबरपर्यंत असून या सप्ताहात वनविभागाने दाखवलेल्या तत्परतेबद्दल डॉ. मोरे व लोकप्रतिनिधींनी वनविभागाचे कौतुक केले.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या