Satara News : पेट्रोलिंग करत असलेल्या दोन पोलिसांवर प्राणघातक हल्ला


एकजण गंभीर जखमी; सातारा शहराजवळ महामार्गावरील घटनेने खळबळ
 

Satara News : पेट्रोलिंग करीत असताना अज्ञात इसमांनी दोन पोलिसांवर प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी रात्री घडली. यामध्ये एक पोलीस गंभीर जखमी आहे. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सातारानजीक शिवराज पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली.

मंगळवारी रात्री डोलारे व हिंडे हे दोन पोलीस कर्मचारी शिवराज पेट्रोल पंपाजवळ पेट्रोलिंग करीत असताना अंधारामध्ये सुमारे चार ते पाच अज्ञात इसम दिसून आले. त्या अज्ञात इसमाना हटकले असता त्यांनी अचानकपणे दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केला. त्यामध्ये एक पोलीस गंभीर जखमी झाला. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कोम्बिंग ऑपरेशन राबवले असता त्यातील एका संशयिताला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. 

याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस दिनापूर्वी मध्यरात्रीला ही घटना घडल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या