Satara News : डॉ. संदीप काटे यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद


फेसबुकवरील पोस्टला विरोधात कमेंट देऊन धमकावल्याची तक्रार

Satara News : फेसबुकवर टाकलेल्या पोस्टला विरोधात कमेंट देऊन त्याद्वारे तुला आता दाखवतो, तुला बघून घेतो असे म्हणून दमदाटी केल्याप्रकरणी सातारा येथील डॉ. संदीप सूर्यकांत काटे यांच्याविरूध्द शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे.

सुजीत बाळकृष्ण आंबेकर (रा. सातारा) यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आंबेकर यांनी त्यांच्या फेसबुक अकौंटवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टवर डॉ. काटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

ही प्रतिक्रिया आपल्या विरोधात असून त्यामध्ये, तुला आता दाखवतो, तुला बघून घेतो अशी धमकी दिली असल्याचे आंबेकर यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबतचे स्क्रीन शॉट काढून पोलीस ठाणे गाठले. फेसबुकवरील प्रतिक्रियाप्रकरणी तक्रार असल्याचे पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील अधिक तपास हवालदार जगदाळे करत आहेत.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या