कामाच्या ताणाचा पोलिसांच्या आरोग्यावर परिणाम, त्यांना सहकार्य करा : बन्सल
Satara News : पोलीस स्मृतीदिनानिमित्त गेल्या वर्षभरात कर्तव्य बजावत असताना धारातीर्थी पडलेले देशभरातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल यांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.
कामाचा ताण वाढल्याने पोलिसांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन अजयकुमार बन्सल यांनी यावेळी केले.
पोलीस मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्यासह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
२६/११ चा अतिरेकी हल्ला आठवल्यावर आजसुद्धा आपल्या अंगावर शहारे उभे राहतात. सीमेवर काम करत असताना तेथे शत्रू कोण, मित्र कोण याची पूर्वकल्पना असते. परंतु अंतर्गत सुरक्षा करताना तेथे शत्रू कोण व मित्र कोण याची माहिती पोलिसांना नसते.
लोकसंख्येच्या मानाने पोलिसांची संख्या वाढली नाही
कोणीही क्षुल्लक कारणावरुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करु शकतो. अंतर्गत सुरक्षा व्यवस्था सांभाळणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची शहिद होण्याची संख्या वाढली आहे, याबद्दल बन्सल यांनी चिंता व्यक्त केली.
देशाची लोकसंख्या वाढली परंतु त्यामानाने पोलिसांची संख्या वाढली नाही, त्यामुळे अतिरिक्त कामाचा ताण वाढला असून त्याचा पोलिसांच्या आरोग्यावर परिणाम होवू लागला आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक नागरिकांने पोलिसांना काम करताना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या