सातारा तालुका पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण विभागाची कामगिरी
Satara News : सातारा तालुक्यातील सैदापूर येथील बिअर शॉपीचे शटर उचकटून दुकानातून तब्बल २४ हजार रुपये किंमतीची दारु व रोख ४ हजार रुपये चोरणाऱ्या टोळीला सातारा तालुका पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने अटक केली. संशयितांकडून पोलिसांनी दारुसाठा जप्त केला आहे.
अर्जुन नागराज गोसावी (रा. सैदापूर), विपूल तानाजी नलवडे (रा. करंजे), ओंकार पिलाजी पवार (रा. रणदुलाबाद, ता. कोरेगाव) अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी राम दशरथ इंदलकर (वय ३५, रा. कळंबे, ता. सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तक्रारदार यांची बिअर शॉपी आहे. दि. १६ रात्री अज्ञातांनी बिअर शॉपी फोडून दुकानातून दारुच्या बाटल्या व रोख रक्कम चोरुन नेली. सकाळी ही घटना समोर आल्यानंतर याबाबतची माहिती तालुका पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन तपासाला सुरुवात केली.
संशयितांकडून गुन्ह्याची कबुली
डीबीचे पथक तपास करत असताना संशयितांची माहिती मिळाली. पोलिसांनी संशयितांकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत संशयितांना बोलते केल्यानंतर त्यांनी दारु लपवून ठेवलेली जागा दाखवली. पोलिसांनी ती दारु जप्त केली व संशयितांना ताब्यात घेतले. संशयितांचे रेकॉर्ड तपासले असता ते सराईत असल्याचे समोर आले.
पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दादा परिहार, सुजीत भोसले, सागर निकम, सतीश पवार, नितीराज थोरात यांनी कारवाईत सहभाग घेतला.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या