कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज; पालकमंत्र्यांकडून नुकसानीची पाहणी
Satara News : चालू महिन्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे कृषी विभागाच्या प्राथमिक नजरअंदाजानुसार सातारा जिल्ह्यातील १ हजार ४२० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
संबंधित विभागांनी या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन तसा अहवाल सादर करावा, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या.
अतिवृष्टीमुळे सातारा तालुक्यातील अंबवडे बुद्रुक या गावातील नुकसान झालेल्या भात पिकाची पाहणी त्यांनी केली. त्यावेळी त्यांनी प्रशासनाला या सूचना केल्या.
या पाहणीप्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल, तहसीलदार आशा होळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत आदी उपस्थित होते.
सातारा तालुक्यातील भात, सोयाबीन व भुईमुग ६० हेक्टर, कोरेगाव तालुक्यातील सोयाबीन, भाजीपाला व आले १२० हेक्टर, खटाव तालुक्यातील बटाटा, कांदा ७० हेक्टर, कराड भात, ज्वारी २० हेक्टर, पाटण तालुक्यातील भात २०० हेक्टर, खंडाळा तालुक्यातील भाजीपाला ५ हेक्टर, वाई तालुक्यातील भात, सोयाबीन व भाजीपाला १५ हेक्टर, महाबळेश्वर तालुक्यातील भात ३० हेक्टर, फलटण तालुक्यातील भाजीपाला, मका व ज्वारी ३९० हेक्टर, माण तालुक्यातील ज्वारी व मका ५१० हेक्टर असे एकूण १ हजार २४० क्षेत्रावरील पिकांचे कृषी विभागाच्या प्राथमिक नजरअंदाजानुसार नुकसान झाले आहे.
अतिवृष्टीच्या कालावधीत दक्षता घ्या
जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधून सध्या विसर्ग सुरु आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास हा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे. तसेच भारतीय हवामान खात्याने पुढील काही दिवसात बहुतेक ठिकाणी वीजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. या अतिवृष्टीच्या कालावधीत जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी केले आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या