वाकेश्वर ग्रामस्थांचा अल्टिमेटम; सुधारणा न झाल्यास आंदोलन
Satara News : वाकेश्वर (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक बदलीच्या घोळात नागरी सेवा सुविधांचा पूर्ण बोजवारा उडाला आहे. वरिष्ठांनी तातडीने दखल घेवून योग्य त्या सुधारणा न केल्यास ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
वाकेश्वरचे ग्रामसेवक एल. व्ही. चिंचकर यांची नऊ महिन्यापूर्वी मांडवे येथे बदली झाली होती. त्यांच्या जागी अंभेरी, कोकराळे येथील ग्रामसेवक सोमनाथ सावंत यांची नियुक्ती करण्यात आली होती. बदलीचे आदेश होऊनही मार्च एंडींग व इतर तांत्रिक कारणावरुन चार्ज देवाण घेवाणीस चार महिन्यांचा कालावधी गेला.
त्यानंतर सावंत यांच्याकडे एकदाचा चार्ज आला. त्यांनी पहिल्याच महिन्यात स्वत:च्या अधिकारात लेखनिकाची नियुक्ती केली. बदलीचा घनशाघोळ व कोरोना परिस्थितीमुळे कर वसुलीची पूर्ण बोंबाबोंब झाली आहे. एका बाजूला वसुली कमी असल्यामुळे पाणीपुरवठा, स्वच्छता कर्मचारी यांचे वेतन रखडले आहे. तर दुसरीकडे नवीन नेमलेल्या लेखनिकाचा पहिल्याच महिन्यात पगार झाल्यामुळे मूळच्या दोन कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.
गटराच्या पाण्याने वळविली रस्त्याकडे वाट
अशा परिस्थितीत त्यांनी जेमतेम काम सुरु ठेवले आहे. त्यामुळे काही ठिकाणी गटर तुंबले आहेत. मातंग वस्तीनजीक चेंबर तुंबल्यामुळे गटराच्या पाण्याने रस्त्याकडे वाट वळविली आहे. या प्रकारामुळे मातंग वस्तीवरील नागरिक तसेच दैनंदिन वाहतुक करणारे नागरिक यांना नरकयातना सहन कराव्या लागत आहेत.
त्याचबरोबर दलित वस्ती योजनेतून लाखो रुपये खर्च टाकलेल्या रस्त्याचे वाटोळे होण्यास वेळ लागणार नाही. तर मंदिर परिसरातील तत्कालीन खासदार विजयसिंह मोहिते - पाटील यांच्या निधीतून मंजूर झालेला हायमास्ट पोल तसेच स्मशानभूमी नजीकचा हायमास्ट लाईट गेली काही महिने बंद असल्यामुळे हे दोन्ही शोपिस ठरले आहेत.
दरम्यानच्या काळात ग्रामसेवक सावंत यांची प्रकृती बिघडल्याने त्यांचा कार्यभार पुन्हा चिंचकर यांच्याकडे देण्यात आला आहे.
या प्रकारासंदर्भात पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ उपाययोजना न केल्यास कामचुकार ग्रामसेवक तसेच त्यांना पाठीशी घालणारे अधिकारी यांच्याविरोधात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करण्याबरोबरच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वि. का. स. सेवा सोसायटीचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव साठे, युवा कार्यकर्ते सूरज भांडवलकर यांनी दिला आहे.
पिसेंनी तत्परता दाखवली पण...
वरील प्रकाराबाबत प्रशासक तथा शिक्षण विस्तार अधिकारी लक्ष्मणराव पिसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तातडीने या गोष्टीची ग्रामसेवकांना कल्पना दिली. पण अजून सह्यांचे अधिकार नाहीत, कर्मचाNयांना सांगितले आहे असे सांगत ग्रामसेवक वेळकाढूपणाचे धोरण अवलंबत आहेत.
Get all live and latest Satara news, Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या