सोयाबीन, घेवड्यासह काढणीला आलेल्या पिकांचे अपरिमित नुकसान
Satara News : सातारा जिल्ह्यात शनिवारी दुपारपासून परतीच्या पावसाचे थैमान सुरू झाले असून त्यामुळे काढणीला आलेल्या पिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. दुष्काळी भागाला या पावसाचा मोठा तडाखा बसला असून ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचून राहिले आहे.
खरीप हंगामातील पिकांच्या काढणीची कामे सध्या सुरू आहेत. त्यामुळे शेतकरी शेतात गुंतला आहे. सोयाबीन, घेवडा तसेच भुईमुगाची वाळवणे पडली आहेत.
काही ठिकाणी सोयाबीन, घेवडा काढता काढताच जिल्ह्यात जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू झाल्याने मळणीची कामेही होऊ शकली नाहीत. शेतातच काढलेल्या पिकांचे ढीग झाकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची प्रचंड धांदल उडाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.उत्तर भागात ढगफुटीसारखा पाऊस
सातारा, कराड, पाटण तसेच कोरेगाव, माण, खटाव, फलटण तालुक्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह दमदार पाऊस होत आहे. दुष्काळी माण, खटावमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस होत आहे.
खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील पुसेगावपासून बुध, डिस्कळ, मोळपर्यंत ढगफुटीसारखा पाऊस झाला असून शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे.
प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे.
Get all live and latest Satara news, Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या