Satara News : सणासुदीच्या काळात रेशन दुकानात ‘या’ वस्तू देण्याची मागणी


नागरिकांना दिलासा द्या : डॉ. नीलम गोऱ्हे यांची पत्राद्वारे राज्य सरकारकडे विनंती

Satara News : दिवाळी, दसरा यासारखे सण साजरे करण्यासाठी शासनाकडून नागरिकांना दिलासा म्हणून गहू, तांदूळ, चणाडाळ बरोबरच साखर, तेल, रवा, मैदा हे रास्त भावात स्वस्त धान्य दुकानात देण्याचे नियोजन करावे, अशी मागणी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. 

लॉकडाऊनमुळे नागरिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. तसेच पुढील काही दिवसात दसरा आणि दिवाळी हे मोठे सण आहेत. हे सण साजरे करताना तारेवरची कसरत नागरिकांना करावी लागणार आहे. त्यातच मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मुंबईमध्ये अतिवृष्टी झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे यादृष्टीने नियोजन करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

यासंदर्भात डॉ. गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांना पत्राच्या माध्यमातून ही विनंती केली आहे. तसेच आज (दि. १६) पुण्यातील विधानभवन येथे अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतदेखील त्यांनी ही अपेक्षा व्यक्त केली.

मंत्रिमंडळ बैठकीत विचार करणार !

त्याचप्रमाणे नवरात्रोत्सव काळात नागरिक व महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपवास करतात. यासाठी रास्त भावात शेंगदाणे, साबुदाणा किंवा भगर त्वरित उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी सूचना केली. याबाबत कॅबिनेट बैठकीत विचार केला जाईल अशी ग्वाही पवार यांनी या बैठकीत दिली.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या