राज्य सरकारचा मोठा निर्णय; पदोन्नतीच्या प्रतीक्षेतील कर्मचाऱ्यांचे स्वप्न साकार
PSI Pramotion News : पोलीस उपनिरीक्षक पदाच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने दिवाळीचे गिफ्ट दिले आहे. सरकारने पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला असून खात्याअंतर्गत प्रदीर्घकाळ रखडलेली पदोन्नती जाहीर केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील १०६१ पोलीस बांधवांचा पोलीस उपनिरीक्षक बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सन २०१३ मध्ये पोलीस उपनिरीक्षक अर्हता परीक्षा घेण्यात आली होती. त्यामध्ये जवळपास १८ हजार पोलीस हवालदार उत्तीर्ण झाले होते. पण पदोन्नती मिळण्यासाठी त्यांना प्रदीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली. यासाठी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा सुरू होता.
या प्रयत्नांना अखेर यश आले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने या कर्मचाNयांना न्याय देण्याचे काम केले. यामुळे पोलीस कर्मचाNयांमध्ये समधानाचे व उत्साहाचे वातावरण आहे.
पोलीस महासंचालकांच्या आदेशाने आस्थापना विभाग प्रमुख राजेश प्रधान यांनी आज पदोन्नती देण्यात आलेल्या १०६१ पोलीस कर्मचाऱ्यांची यादी प्रकाशित केली. यादी प्रकाशित होताच राज्यातील पोलिसांमध्ये उत्साह निर्माण झाला. सरकारच्या या निर्णयामुळे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे अनेकांचे स्वप्न साकार झाले आहे. याबद्दल त्यांच्यावर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. या वर्षावात हे सर्व पोलीस उपनिरीक्षक अक्षरश: आनंदून - मोहरून गेले.
गृहमंत्री देशमुख यांच्याकडून अभिनंदन
प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नती मिळालेल्या पोलीस उपनिरीक्षकांनी अधिक जोमाने कार्य करावे. तुमच्या सर्वांकडून अधिक उत्तम कामाची अपेक्षा आहे, अशा शब्दात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदोन्नती मिळालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या