सांगली जिल्ह्यात २९ वसाहती; ३० वर्षांपासून अनेक प्रश्न प्रलंबित
Sangli News : वारणा धरण प्रकल्पग्रस्त आणि चांदोली अभयारण्यग्रस्त यांच्या अडीअडचणी सोडवण्याबाबत व जमीन वाटपाबाबत पुनर्वसन पंधरवडा जाहीर करण्यात आला आहे. त्यासाठी महसूल, वनविभाग, वारणा कालवे प्रकल्प विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी संबंधित प्रकल्पग्रस्तांनी उपस्थित राहून आपल्या अडचणी, प्रश्न यांची माहिती देण्याचे आवाहन डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होऊन ३० वर्षांचा कालावधी लोटला आहे. तरीही अजून त्यांच्यासंबंधीचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी खास हा पंधरवडा जाहीर करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले आहेत.
पुनर्वसित नागरिकांच्या शिल्लक जमीन वाटप, शिल्लक भूखंड वाटप, अडथळा खटले प्रकरणे, न्यायालयीन खटले, वसाहतीतील अपूर्ण नागरी सुविधा, जमीन वाटप व भूखंड झालेल्या आदेशाच्या नोंदी ७/१२ वर अद्ययावत झाल्या आहेत का, या नोंदी वर्ग २ मधून वर्ग १ झाल्या आहेत का तसेच अनुषंगिक विषयांबाबत यावेळी आढावा घेतला जाणार आहे.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, पुनर्वसन अधिकारी अरविंद लाटकर, तेजस्विनी पाटील, कार्यकारी अभियंता डी. डी. शिंदे, डी. डी. पाटोळे, व्ही. एम. पाटील, प्रांताधिकारी नागेश पाटील, तहसीलदार गणेश शिंदे, वनक्षेत्रपाल सुशांत काळे, भूमी अभिलेख अधिकारी आदी उपस्थित राहणार आहेत. नागरिकांचे प्रश्न जागेवर सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
अधिकारी २९ ठिकाणी भेटी देणार
सांगली जिल्ह्यात शिराळा, वाळवा, मिरज तालुक्यात कवठेपिरान, इस्लामपूर, बिळाशी, प. त. वारून, मांगले, सांगाव, आरळा, येलूर, कुरळप, बोरगाव, चिकुर्डे, नेर्ले, साखराळे, शिगाव, बागणी, आष्टा, फाळकेवडी, बहाद्दूरवाडी, वाळवा, नवे खेड, कसबे डिग्रज, दुधगाव, तुंग, समडोळी या गावांमध्ये २९ वसाहती आहेत. या सर्व ठिकाणी हे पथक प्रत्यक्ष भेट देणार आहेत.
प्रश्न मार्गी लावण्यासाठी सहकार्य करा !
प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न ३० वर्षांपासून प्रलंबित आहेत. जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी या पंधरवड्याचे आयोजन केले आहे. यावेळी प्रकल्पग्रस्त नागरिकांनी आपल्या अडीअडचणी सांगून आपले प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सहकार्य करावे. वनविभाग, महसूल, वारणा प्रकल्प अधिकारी या सर्व विभागांचे अधिकारी या २९ ठिकाणी भेट देणार आहेत. प्रत्येक ठिकाणी कोणत्या दिवशी हे सर्व अधिकारी व कर्मचारी येणार आहेत त्याची माहिती त्या त्या गावात देण्यात येईल.
- आमदार मानसिंगराव नाईक
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या