वारंवार घडणाऱ्या प्रकारामुळे वैतागून नोंदवली शाहूपुरी पोलिसात तक्रार
Satara News : सोशल मीडियावर फोटो व त्यासोबत अश्लील मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात भाग्यश्री दिलीप शिवणकर (रा. मारवाड पेठ, बारामती) या महिलेवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबतची तक्रार जयदेव राजेंद्र भालेराव (रा. कोणार्क अपार्टमेंट, शाहूपुरी, सातारा) यांनी नोंदवली आहे.
भालेराव यांनी २०१९ मध्ये भाग्यश्री यांच्याशी प्रेमविवाह केला होता. त्यानंतर ते कामानिमित्त पुणे येथे गेले. या ठिकाणी पत्नी भाग्यश्री व त्यांच्यात वाद होऊ लागले. वादानंतर ते पुन्हा बारामती येथे गेले. या ठिकाणीसुद्धा वाद न थांबल्याने पत्नीला त्याच ठिकाणी सोडून जयदेव हे सातारा येथे परतले.
दरम्यान, त्यांच्या नात्यातील महिलांचे फोटो भाग्यश्री यांनी इंस्टाग्रामवर व्हायरल केले. या फोटोखाली काही अश्लील मेसेज प्रसारित करण्यात आला होता.
असाच एक मेसेज दि. २८ ऑक्टोबर रोजी रात्री जयदेव यांच्या इंस्टाग्रामवर आला. तो त्याच्या मित्राने ओपन केला असता तशाच पद्धतीचे फोटो, अश्लील मेसेज व नात्यातील महिलेचा मोबाईल नंबर त्यात देण्यात आला होता.
वारंवार घडणाऱ्या या प्रकारामुळे वैतागलेल्या जयदेव भालेराव यांनी याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविली. त्यानुसार भाग्यश्री शिवणकर यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या