Satara News : सावधान... जिल्ह्यात कोरोनाची आकडेवारी काय सांगते ?


सलग तीन दिवस रूग्णवाढ दोनशेपार; बळी १७०० च्या उंबरठ्यावर

Satara News : सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसात घटत गेलेली कोरोनाची रूग्णसंख्या पुन्हा संथ गतीने वाढत असल्याचे संकेत आकडेवारीतून मिळत आहेत. नागरिकांसाठी हा धोक्याचा इशारा असून प्रत्येकाने दक्षता घेणे गरजेचे आहे. 

गेले तीन दिवस सलगपणे दोनशेच्या वर रूग्ण वाढत आहेत. मागील चोवीस तासात २४८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून काल रात्रीपासून १२ जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये...

सातारा तालुका : सातारा ९, मंगळवार पेठ २, गुरुवार पेठ २, शनिवार पेठ १, रविवार पेठ २, केसरकर पेठ १, पंताचा गोट १, गडकर आळी १, संभाजीनगर १, सदर बझार २, करंजे पेठ ३, शाहूपुरी १, शाहूनगर २, सैदापूर १, दौलतनगर १, संगमनगर २, वनवासवाडी १, पाडळी २, लिंबाचीवाडी १, विलासपूर २, शेरेवाडी १, करंडी १, अंगापूर १, अतित २, गोवे २, लिंब १, नागठाणे १, चिंचणेर वंदन १, शिवथर १, क्षेत्र माहुली २.

कराड तालुका : कराड ४, शुक्रवार पेठ १, उंब्रज १, विद्यानगर २, कडेपूर १, कोर्टी १, सुर्ली १, शेरे १, वडोली निळेश्वर १, मलकापूर १,  रेठरे बुद्रुक १, नांदगाव १, सोनकिरे १.

पाटण तालुका : किल्ले मोरगिरी १, मरळी २, मंद्रुळकोळे १, कुंभारगाव १.

फलटण तालुका : फलटण १, रिंगरोड, फलटण २, लक्ष्मीनगर २, कोळकी ४, जिंती १, सस्तेफाटा १, साखरवाडी २, रावडी बुद्रुक १, पिंपळगाव १, वाखरी १, निंभोरे १, काशिदवाडी ३, तरडगाव २, सावडी १, पिंपळवाडी ८, सांगवी १, कापडगाव १, मिरेवाडी १.

खटाव तालुका : वडूज २, पुसेगाव १, कातळगेवाडी १, मायणी ४, होळीचागाव १, दातेवाडी १, खटाव १.

माण तालुका : दहिवडी ५, गोंदवले बुद्रुक ४, पळशी १, इंजबाव २, म्हसवड ५, शिंगणापूर १, देवापूर १, विरळी ५, धामणी ५, देवापूर १, गोंदवले खुर्द ७, बोडके १.

कोरेगाव तालुका : कोरेगाव ७, कुमठे १, खेड २, आसगाव १, रहिमतपूर ३, शिरंबे १, बिचुकले ३, भाडळे ५, आर्वी १, एकसळ १, शिरढोण ३, गोगावलेवाडी १, घाडगेवाडी १, चांदवली १, दुघी १, साप १.

जावली तालुका : डांगरेघर १.

वाई तालुका : गंगापुरी २, वाई १, यशवंतनगर २, रामढोहआळी ४, सदाशिवनगर ३.

खंडाळा तालुका : मिर्जे १, भादे ५, लोणंद ५, शिरवळ ७, खंडाळा ८, बावडा ५.

महाबळेश्वर तालुका : महाबळेश्वर १, पाचगणी २, भिलार १.

जिल्ह्यात १२ बाधितांचा मृत्यू

सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये आरफळ (ता. सातारा) येथील ८८ वर्षीय पुरुष, नागठाणे (ता. सातारा) येथील ७५ वर्षीय पुरुष, तारळे (ता. पाटण) येथील ६५ वर्षीय महिला. जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये शुक्रवार पेठ (सातारा) येथील ५३ वर्षीय पुरुष, शिरंबे (ता. कोरेगाव) येथील ७२ वर्षीय पुरुष, वडूज (ता. खटाव) येथील ८५ वर्षीय पुरुष, म्हसवे वर्ये (ता. सातारा) येथील ८० वर्षीय पुरुष, संभाजीनगर (ता. खंडाळा) येथील ८५ वर्षीय पुरुष तसेच रात्री उशिरा कळविलेले कोळकी (ता. फलटण) येथील ३८ वर्षीय पुरुष, संत भानुदासनगर (फलटण) येथील ८१ वर्षीय पुरुष, सांगवी (ता. जावली) येथील ६८ वर्षीय पुरुष, म्हसवड (ता. माण) येथील ६० वर्षीय पुरुष अशा एकूण १२ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

सातारा जिल्हा कोरोना

  • एकूण नमुने - २४०८१३
  • एकूण बाधित - ५०३५१  
  • घरी सोडण्यात आलेले - ४७३८६  
  • मृत्यू - १६९९
  • उपचारार्थ रुग्ण - १२६६

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या