Satara News : जिल्ह्यात १७८ रूग्णांची वाढ; ४ जणांचा कोरोनाने मृत्यू


दिवसभरात ५८३ जणांना डिस्चार्ज, तर ३४४ जणांचे नमुने तपासणीला

Satara News : सातारा जिल्ह्यात बुधवारी रात्री जाहीर झालेल्या रिपोर्टनुसार १७८ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर ४ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

दरम्यान, आज दिवसभरात ५८३ नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याने जिल्ह्याला खूप मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांचा तणाव काहीसा कमी झाला आहे. आता कोरोनामुक्तांची संख्या ४८ हजारांच्या पुढे गेली आहे. 

आज क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथील २६, कराड येथील १७, फलटण ४, कोरेगाव २९, वाई ११, खंडाळा २७, रायगाव १५, पानमळेवाडी १८, मायणी ८, महाबळेश्वर ४४, पाटण ८, दहिवडी ४८, म्हसवड येथील ११ व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील ७८ अशा एकूण ३४४ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. 

कोरोना बाधित अहवालामध्ये...

सातारा तालुका : सातारा २, रविवार पेठ १, मल्हार पेठ १, राधिका रोड १, करंजे पेठ २, विसावा नाका २, कोडोली १, गोडोली १, कृष्णानगर १, अंबेदरे १, आंबळे १, गोजेगाव १, लिंब १, परळी १, देगाव १, शिवथर १, वेळे १.  

कराड तालुका : कराड १, शनिवार पेठ १, कोयना वसाहत १, आगाशिवनगर १, मलकापूर १, विंग १, येलुर १, सैदापूर २, हाटगाव १, येणके १, किवळ २, रिसवड १, नावदे १, आटके १, उंब्रज १.

फलटण तालुका : फलटण ६, कोळकी ३, बुधवार पेठ १, मंगळवार पेठ १, मलठण १, उमाजी नाईक चौक १, संत बापूदास नगर १, सन्मती नगर १, लक्ष्मीनगर १, टाकाळेवाडी १, साठेगाव १, साखरवाडी ६, मिरढे १, खामगाव १, सुरवडी २, झरकबाईचीवाडी ३, ताथवडा १, विडणी १, मठाचीवाडी १, मुरुम १, वाठार निंबाळकर १, कोर्‍हाळे १, दुधेबावी २, तरडगाव १, घाडगेमळा १, ढवळेवाडी ३, होळ १, बरड १, तडवळे १, गारपिटवाडी १.

खटाव तालुका : खटाव २, पुसेगाव १०, जाखणगाव ३, वडूज ५, कातरखटाव २, खातवळ १, ओंध १, रणसिंगवाडी १, तुपेवाडी १.

माण तालुका : गोंदवले खुर्द २, मार्डी १, म्हसवड ३, पिंगळी बुद्रुक २, भिवडी १.

कोरेगाव तालुका : कोरेगाव ४, अंभेरी २, वेळू १, सुर्ली १.

जावली तालुका : कुडाळ ३, करंडी १०.

वाई तालुका : वाई २, रविवार पेठ १, धर्मपुरी १, आसले २, उडतारे १.

खंडाळा तालुका : लोणंद १, शिरवळ १, खंडाळा २, सुखेड २, पाडेगाव २, अंदोरी ३.

जिल्ह्यात ४ बाधितांचा मृत्यू

सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये वडूथ (ता. सातारा) येथील ७२ वर्षीय पुरुष, तसेच विविध खासगी हॉस्पिटलमध्ये पाटण येथील ८१ वर्षीय पुरुष, दुघी (ता. कोरेगाव) येथील ७२ वर्षीय महिला, तांबवे (ता. फलटण) येथील ७४ वर्षीय महिला अशा एकूण ४ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

सातारा जिल्हा कोरोना

  • एकूण नमुने - २४२७२९
  • एकूण बाधित - ५०५२९  
  • घरी सोडण्यात आलेले - ४८०७८  
  • मृत्यू - १७०३
  • उपचारार्थ रुग्ण - ७४८

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या