सातारा, फलटण तालुके वगळता अन्य तालुक्यात रूग्णसंख्या रोडावतेय
Satara News : सातारा जिल्ह्यात चोवीस तासात १३५ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून जिल्ह्यातील बाधितांची संख्या ५१ हजारांच्या पुढे गेली आहे. तसेच आज दिवसभरात ८८ जणांना दवाखान्यातून घरी सोडण्यात आले असून कोरोनामुक्तांची संख्या ४८ हजार ३८० वर गेली आहे.
दरम्यान, काल रात्रीपासून ३ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तर सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथील ८ व पिंपोडा येथील १८ अशा एकूण २६ जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
कोरोना बाधित अहवालामध्ये...
सातारा तालुका : सातारा ४, गुरुवार पेठ १, गोडोली २, सदर बझार १, शाहूनगर २, जरेवाडी १, बोरगाव १, बोरखळ ४, खामगाव १, लिंब ३, वनवासवाडी १, पोगरवाडी १, नेले किडगाव १.
कराड तालुका : कराड ४, मलकापूर २, सैदापूर १, कार्वे २, शामगाव १, विंग १, कोळेवाडी १, येळगाव १, कोरेगाव २, आटके १, हेळगाव १, वडोली १, ओंड १.
पाटण तालुका : बेलवडे खुर्द १.
फलटण तालुका : फलटण ६, गोळीबार मैदान २, मलटण १, कोळकी १, सांगवी १, ढवळेवाडी १, मुरुम २, साखरवाडी ७, पिंपळवाडी १, फडतरवाडी १, तिरकवाडी १, गुणवरे २, सुरवडी २, हिंगणगाव १, विडणी १, खराडेवाडी १.
खटाव तालुका : खटाव १२, फडतरवाडी १, ललगुण १.
माण तालुका : दहिवडी १, गोंदवले १, कुळकजाई १, म्हसवड ५, मार्डी १, धनगरवाडी १, पानवन१, झाशी १.
कोरेगाव तालुका : कोरेगाव २, सुर्ली १, एकसळ १, तारगाव २.
जावली तालुका : सायगाव १.
महाबळेश्वर तालुका : पाचगणी १.
वाई तालुका : दत्तनगर १, कडेगाव ३, सिध्दनाथवाडी १, ओझर्डे ६.
खंडाळा तालुका : लोणंद ३, मिरजे १, शिरवळ २.
जिल्ह्यात ३ बाधितांचा मृत्यू
जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये वाठार बुद्रुक (ता. खंडाळा) येथील ५५ वर्षीय महिला, उंब्रज (ता. कराड) येथील ८५ वर्षीय महिला, बिदाल (ता. माण) येथील ७३ वर्षीय पुरुष अशा एकूण ३ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सातारा जिल्हा कोरोना
- एकूण नमुने - २४७३२९
- एकूण बाधित - ५१०५९
- घरी सोडण्यात आलेले - ४८३८०
- मृत्यू - १७१३
- उपचारार्थ रुग्ण - ९६६
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या