Satara News : सातारा जिल्ह्यात पदवीधरसाठी ५४ हजारांवर मतदार


कराडमध्ये सर्वाधिक; शिक्षक मतदारांची एकूण नोंदणी ७ हजार ६१८
 

Satara News : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदार आणि शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीत पुणे पदवीधर मतदारसंघासाठी जिल्ह्यात ५४ हजार ८३५ मतदारांची नोंदणी झाली आहे. शिक्षक मतदारांची एकूण नोंदणी ७ हजार ६१८ झाली आहे. 

प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पुणे पदवीधर मतदार व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण मतदान केंद्रांची संख्या १६८ आहे. यामध्ये पदवीधरसाठी १२४, तर शिक्षक मतदार साठी ४४ केंद्र आहेत. 

पदवीधरांसाठी मतदारांची सर्वाधिक नोंदणी कराड तालुक्यात १४ हजार ४१३, तर सर्वात कमी ४९६ महाबळेश्वर तालुक्यात झाली आहे. 

दोन्ही निवडणुकीसाठी आचारसंहिता सुरू

या दोन्ही निवडणुकीसाठी २ नोव्हेंबरपासून आचारसंहिता सुरू झाली असून प्रचारादरम्यान घरोघरी जाताना केवळ पाच व्यक्ती, तर रॅलीमध्ये पाच वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे मतदानादरम्यान प्रत्येक मतदाराची केंद्रात येताना थर्मल स्क्रिनिंगद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. 

याचबरोबर एका मतदान केंद्रावर ७०० मतदारांना मतदान करता येणार आहे. निवडणुकीच्या काळात उमेदवारांच्या प्रचार सभांवर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथकांची स्थापना करण्यात येणार आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

पुणे पदवीधर मतदारसंघाची मुदत जुलै महिन्यात संपली होती. मात्र कोरोनामुळे या निवडणुका लांबणीवर पडलेल्या होत्या. नुकत्याच निवडणुका जाहीर झाल्या असून, १२ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे. १३ नोव्हेंबरला अर्जाची छाननी होणार असून, १७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. एक डिसेंबरला मतदान, नंतर पुणे या ठिकाणी तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या