Satara News : आदित्य ठाकरे कास, वजराई, ठोसेघरला भेट देणार


पर्यटन स्थळांच्या विकासासंदर्भात शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा
 

Satara News : कास, वजराई तसेच ठोसेघर धबधबा परिसरातील पर्यटन व्यवसाय वाढीस लागण्यासाठी व आसपासच्या गावांतील जनतेला रोजगार उपलब्ध होण्यासाठी दिवाळीनंतर प्रत्यक्ष भेट देऊन या विभागातील विकास कामे मार्गी लावली जातील, असे आश्वासन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी या भागातील शिष्टमंडळास दिले.

माजी आमदार दगडूदादा सपकाळ यांच्यासह स्थानिक लोकांनी त्यांची भेट घेऊन निवेदन दिले. याप्रसंगी कराड उत्तरचे संपर्कप्रमुख शंकर सपकाळ, रवींद्र मोरे, कोंडीबा शिंदे, जितेंद्र सपकाळ, नंदकुमार गोरे, प्रदीप कदम, लक्ष्मण आखाडे, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जगन्नाथ माने, नामदेव मोरे आदी उपस्थित होते.

यावेळी झालेल्या चर्चेचा तपशील सांगताना सपकाळ म्हणाले, जिल्हा निसर्गसंपदेने समृद्ध असून, पर्यटनाच्या दृष्टीने म्हणावा तसा विकास झाला नाही. जिल्ह्यातील फुलांसाठी प्रसिद्ध जागतिक दर्जाचे कास पठार, आशिया खंडातील उंच भांबवली वजराई धबधबा, ठोसेघर धबधबा व परिसरातील विविध पर्यटन स्थळांच्या व आसपासच्या गावांच्या विकासासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

या पर्यटन स्थळांना जाणारे रस्ते दर्जेदार करणे, जगभरातून येणाऱ्या पर्यटकांना उत्तम सुविधा देणे, सुरक्षात्मक उपाय म्हणून पोलीस चौक्या बांधणे व स्थानिक नागरिकांना रोजगार व विकासाची संधी उपलब्ध करून देणे, बामणोली - तापोळा येथील बोटिंग व्यवसाय वाढीसाठी उपाय योजना करणे, या गावातील शेतीमाल, कलाकुसर यांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देणे, हॉटेल व्यवसायाला चालना देणे, या परिसरातील झोनचा असलेला प्रश्न सोडवणे आदी बाबींवर सखोल चर्चा झाली.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या