सातारा येथे आयोजित शिक्षक मेळाव्यात मोदी सरकारवर हल्लाबोल
Satara News : नोटाबंदी, जीएसटी, कोरोना काळातील धोरणे अशा मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देश रसातळाला गेला आहे. या बाबींचा थेट परिणाम पदवीधर आणि शैक्षणिक क्षेत्रावरही झाला असून बेरोजगारी वाढली आहे. युवकांच्या हाताला काम नाही, उद्योग नाहीत. त्याचा समाजजीवनावर परिणाम झाला असून लोकशाही धोक्यात आली असल्याचा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
महाविकास आघाडीचे पुणे शिक्षक मतदार संघाचे उमेदवार जयंत आसगावकर व पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड यांच्या प्रचारार्थ येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे आयोजित शिक्षक मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, शिवसेनेचे नरेंद्र पाटील, शरद लाड, सुरेश जाधव उपस्थित होते.
या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांनी केवळ आश्वासने दिली. प्रत्यक्षात कोणतेही काम केले नाही. यावेळी मात्र मतदार त्यांच्या आश्वासनांना भुलणार नाहीत. जयंत आसगावकर व अरुण लाड यांच्या पाठीशी सातारा जिल्हा आणि महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते ठामपणे राहणार आहेत, असे आमदार शशिकांत शिंदे यावेळी म्हणाले.
धडा शिकवण्याची वेळ आली
साताऱ्यातील पावसातील सभेने महाराष्ट्राला तडाखा दिला. तसाच तडाखा या निवडणुकीत जिल्हा निश्चितपणे विरोधकांना देईल. लोकशाही धोक्यात आणण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. सीबीआय, इडी अशा चौकशांचा ससेमिरा मागे लावणाऱ्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे.
ही लढाई केवळ उमेदवाराची राहिली नसून विचारांची लढाई झाली आहे. पानिपत युद्ध, स्वातंत्र्य लढा, प्रतिसरकारच्या वेळी सातारा जिल्ह्यानेच क्रांतीची जबाबदारी पेलली होती. यावेळीही अशी क्रांती साताऱ्यातून होईल, असा विश्वास नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केला.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या