रहिमतपूर येथील मेळाव्यात बाळासाहेब पाटील यांचा निर्धार
Satara News : पुणे विभागातील भाजपची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी सातारा जिल्ह्यातून महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताधिक्य देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
रहिमतपूर (ता. कोरेगाव) येथील वीरशैव तिराळी समाज जंगम मठात पुणे विभाग पदवीधर मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानगुडे - पाटील होते.
व्यासपीठावर काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र शेलार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष जितेंद्र भोसले, रहिमतपूरचे नगराध्यक्ष आनंदा कोरे, उपनगराध्यक्ष माधुरी भोसले, कांतीलाल पाटील, शहाजीराव क्षीरसागर, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस धैर्यशील सुपले, रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष वासुदेव माने, अविनाश माने आदी मान्यवर उपस्थित होते.
निवडणुकीनंतर भाजपला ‘पदवीधर’चा विसर
पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढवायची आणि निवडून आल्यावर पदवीधर हा शब्द सुद्धा विसरून जायचे, मागची आश्वासने विसरून पुन्हा मते मागायची, असे राजकारण भाजपने आतापर्यंत केले आहे. यापुढे ते चालणार नाही. त्यांना त्यांची जागा दाखवून पुणे विभाग पदवीधर मतदार संघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्क्याने निवडून येतील, असा विश्वास नितीन बानगुडे - पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी राजेंद्र शेलार, वासुदेव माने, सुनील माने यांची समयोचित भाषणे झाली.
सूत्रसंचालन अविनाश माने यांनी केले, तर नगरसेवक विद्याधर बाजारे यांनी आभार मानले. मेळाव्यास कोरेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब निकम, कोरेगाव तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन भागवत घाडगे, आदर्श शिक्षण संस्थेचे चेअरमन नंदकुमार माने-पाटील, राहुल निकम, आनंदराव निकम, राजेंद्र घाडगे, बंडा देशमुख, राजेंद्र मोरे, सुरेश थोरात, सतीश भोसले, प्रा. भानुदास भोसले, दिलीप माने, शशिकांत माने, शशिकांत भोसले, शिवराज माने, आजी-माजी नगरसेवक, परिसरातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या