Satara News : मसूर, उंब्रजच्या वीजयंत्रणेतील समस्या निकाली


‘एक गाव, एक दिवस' उपक्रमांतर्गत सव्वाशेहून अधिक कर्मचारी राबले दिवसभर

Satara News : ‘एक गाव, एक दिवस’ उपक्रमाअंतर्गत सातारा जिल्ह्यात उंब्रज उपविभागातील उंब्रज व मसूर गावातील वीज समस्या निकाली काढल्या आहेत. या दोन गावांत सव्वाशेहून अधिक कर्मचाऱ्यांनी दिवसभरात विजेचे खराब खांब बदलणे, झाडांच्या फांद्या छाटणे, सैल तारांना ताण देणे, स्पेसर्स बसविणे अशी कामे केली तसेच वीजबिलांच्या तक्रारींचे जागेवरच निराकरण केले.

महावितरण बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या संकल्पनेतून 'एक गाव, एक दिवस' हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. कराड विभागात मसूर व उंब्रज ही दोन मोठी गावे आहेत. या ठिकाणी महावितरणची शाखा कार्यालये असून, नियमित कर्मचाऱ्यांमार्फत दैनंदिन कामे केली जातात. 

परंतु, रक्तवाहिन्यांप्रमाणे पसरलेल्या वीज यंत्रणेची देखभाल दुरुस्ती एकाच वेळी करणे सोपे काम नाही. त्यासाठी ‘एक गाव, एक दिवस’ ही अभिनव संकल्पना राबविली असून, परिमंडलात सर्वत्र अत्यंत नियोजनपूर्वक हा उपक्रम राबविण्यात येतो.

नियोजनपूर्वक दिवसभर काम

मसूर व उंब्रज गावच्या वीज समस्या निकाली काढण्यासाठी अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड, कार्यकारी अभियंता अभिमन्यू राख, उपकार्यकारी अभियंता चेतन कुंभार यांनी शाखा अभियंते ऋषीकेश नलावडे, राहूल कराडकर यांना सोबत घेऊन २८ ऑक्टोबरला नियोजन केले. 

मसूर व उंब्रज शाखेचे प्रत्येकी १४ जनमित्र व ठेकेदारांचे १०५ कामगार अशा १३३ मनुष्यबळाच्या मदतीने ३ नोव्हेंबरला काम करण्यात आले. सकाळी ९ ते सायंकाळी ६.३० या वेळेत वीजपुरवठा बंद ठेवून व सुरक्षेची उपाययोजना करुन वीज कर्मचाऱ्यांनी दिवसभर काम केले. 

याकामी शेजारच्या मसूर ग्रामीण शाखेचे आप्पासो माळवदे, शिरवडेचे अभियंता प्रदीप गजरे व उंब्रज ग्रामीणचे शाखा अभियंता प्रमोद पाटील यांनीही मदत केली.

वीजयंत्रणेच्या देखभालीची कामे

केलेल्या ठळक कामांमध्ये मसूर गावातील ५१ गाळ्यातील सैल तारांना ताण दिला. ६ झुकलेले खांब सरळ केले, ३६ गाळ्यातील वीज वाहिन्यांना लागणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटल्या. २५ गाळ्यात स्पेसर्स बसविले, लांब गाळ्यात नवीन ६ खांब उभे केले, १० खराब खांब बदलले, ९ खांबांची उंची वाढविली. २२ गाळ्यात गार्डींग तसेच १२ खांबांचे ताण बसविण्यात आले. 

याशिवाय वीज बिलांसंदर्भात ३५ तक्रारींचे निराकरण करण्यात आले. तर उंब्रज गावातील जवळपास ३.५ किमी अंतरातील झाडांच्या फांद्या तोडल्या. ४ विजेचे खांब बदलले तर ७ गाळ्यातील तारा बदलण्यात आल्या. याशिवाय १ रोहित्राची पेटी, एक एबी स्वीच बदलण्यात आला व एका रोहित्राची उंची वाढवण्यात आली.


कौतुकातून कामाची पोचपावती 

गावातील वीज तक्रारींचे निराकरण करण्यासाठी महावितरणने मोठ्या प्रमाणात राबविलेल्या ‘एक गाव, एक दिवस’ उपक्रमाचे कौतुक करत जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी कार्यकारी अभियंता अभिमन्यू राख यांचा प्रातिनिधीक सत्कार करुन महावितरणचे आभार मानले.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या