आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला यश; ग्रामस्थांमध्ये समाधान
Satara News : आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर आजपासून बामणोली, तापोळा बोटिंगसह वासोटा पर्यटन पुन्हा सुरु झाले असून बामणोली, तापोळा परिसरातील व्यावसायिक आणि ग्रामस्थांनी शिवेंद्रसिंहराजे यांचे आभार मानून समाधान व्यक्त केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात - आठ महिन्यांपासून बामणोली, तापोळा बोटिंगसह किल्ले वासोटा पर्यटन बंद असल्याने या भागातील दोन ते अडीच हजार व्यावसायिकांचे अतोनात नुकसान होत होते. व्यवसाय बंद असल्याने त्यावर अवलंबून असलेल्या लोकांची उपासमार सुरु होती.
शंभूराज देसाई यांच्याकडे पाठपुरावा
पर्यटन आणि हॉटेल व्यवसाय यावर बामणोली, तापोळा परिसरातील सुमारे २ ते अडीच हजार व्यवसायिकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. सर्वत्र सर्वकाही सुरु झाले असल्याने बामणोली, तापोळा येथील बोटिंग आणि वासोटा पर्यटन पूर्ववत सुरु होण्यासाठी आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सोमवारी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेऊन तातडीने सुरु करण्याची मागणी करून तशा सूचना जिल्हा प्रशासनाला करण्यास सांगितले.
यावेळी भैरवनाथ बोट क्लबचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. देसाई यांनी तत्काळ सूचना केल्यानंतर दोन - तीन दिवसात बामणोली, तापोळा बोटिंगसह वासोटा पर्यटन सुरु करण्याचा निर्णय झाला.
किल्ले वासोट्यावर पर्यटकांची पावले
अखेर आजपासून बामणोली, तापोळा बोटिंगसह वासोटा पर्यटन सुरु झाले असून आज सकाळपासूनच बोटीने पर्यटक किल्ले वासोटा दर्शनाला जाण्यास सुरुवात झाली. उदरनिर्वाहाचे मुख्य साधन असलेले बोटिंग आणि पर्यटन सुरु झाल्याने बामणोली आणि तापोळा भागातील विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा बसण्यास सुरुवात झाली असून परिसरातील व्यवसायिक आणि ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या