कोरोनाची स्थिती सध्या आटोक्यात, पण नियमांचे काटेकोर पालन आवश्यक
Satara News : सातारा जिल्ह्यात चोवीस तासात कोरोनाचे २४४ रूग्ण वाढले आहेत. तसेच काल रात्रीपासून ८ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात २३६ नागरिकांना घरी सोडण्यात आले आहे.
सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथील ७१, कराड २२, फलटण ११, कोरेगाव २१, वाई २६, खंडाळा ३४, रायगाव २३, पानमळेवाडी ३२, महाबळेश्वर ३५, पाटण ९, दहिवडी १४, तळमावले ३३ व कृष्णा मेडीकल कॉलेज, कराड येथील ५५ अशा एकूण ३८६ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात कोरोनाची स्थिती सध्या आटोक्यात असून लोकांनी निर्धारपूर्वक मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छता यांचे पालन केल्यास कोरोना संकटाचे लवकर निवारण होऊ शकेल.
कोरोना बाधित अहवालामध्ये...
सातारा तालुका : सातारा ६, शुक्रवार पेठ २, शनिवार पेठ १, मल्हारपेठ १, यादोगोपाळ पेठ १, चिमणपुरा पेठ २, माची पेठ १, करंजे २, शाहूनगर ३, तामजाईनगर २, विसावा नाका १, गोडोली १, सदरबझार ३, कृष्णानगर १, दौलतनगर २, कोडोली १, अंबवडे १, कोपर्डे २, पिंपळवाडी १, नागठाणे ७, जांब १, लिंबाचीवाडी १.
कराड तालुका : आटके १, आगाशिवनगर २, मलकापूर १.
पाटण तालुका : ढेबेवाडी ५, काटेवाडी १, बांबवडे १, तारळे ६, मंद्रुळ कोळे १, कुंभारगाव १.
वाई तालुका : सह्याद्रीनगर १, बावधन १, बोपेगाव १.
फलटण तालुका : फलटण १, बुधवार पेठ १, रविवार पेठ १, लक्ष्मीनगर १, साखरवाडी १, निंभोरे २, बरड १, कोराळे १, हिंगणगाव २, तरडगाव २, खराडवाडी १, कापशी १.
महाबळेश्वर तालुका : महाबळेश्वर २, दांडेघर १, पाचगणी १.
खटाव तालुका : पुसेगाव ४७, डिस्कळ १, खबालवाडी ४, निढळ ८, रेवलकरवाडी २, काटेवाडी २, कातरवाडी ४, नागनाथवाडी १, वर्धनगड २०, मायणी १, बुध २.
माण तालुका : पळशी ४, दहिवडी ६, शिंदी खुर्द २, गोंदवले बुद्रुक १, पिंगळी बुद्रुक २, पांढरवाडी १.
कोरेगाव तालुका : कोरेगाव ३, धामणेर ३, एकसळ ४, वाठार स्टेशन १, रहिमतपूर २, वाठार किरोली २, जत १.
जावली तालुका : मेढा १, कुडाळ १, कुसुंबी १, गांजे ५, काटवली ५, सरताळे ४, आगलावेवाडी ३.
खंडाळा तालुका : शिरवळ १, खंडाळा ३, अहिरे १, फुलमळा १.
जिल्ह्यात ८ बाधितांचा मृत्यू
सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये सिद्धेश्वर कुरोली (ता. खटाव) येथील ७३ वर्षीय पुरुष, विविध खासगी हॉस्पिटलमध्ये तडवळे (ता. खटाव) येथील ८५ वर्षीय पुरुष, तसेच उशिरा कळविलेले महादेवनगर (ता. कोरेगाव) येथील ७५ वर्षीय पुरुष, पुसेगाव (ता. खटाव) येथील ६९ वर्षीय पुरुष, करंजे पेठ (ता. सातारा) येथील ८२ वर्षीय पुरुष, सदरबझार (ता. सातारा) येथील ८२ वर्षीय महिला, विसावा नाका (सातारा) येथील ६५ वर्षीय पुरुष, निंभोरे (ता. फलटण) येथील ७६ वर्षीय पुरुष अशा एकूण ८ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सातारा जिल्हा कोरोना
- घेतलेले एकूण नमुने - १९२१८०
- एकूण बाधित - ४६७७५
- घरी सोडण्यात आलेले - ४२१३४
- मृत्यू - १५६३
- उपचारार्थ रुग्ण - ३०७८
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या