Satara News : सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळे खुली होणार


मार्गदर्शक सूचना व अटी - शर्तींच्या अधिन राहून पर्यटनास परवानगी

Satara News : सातारा जिल्ह्यात कोविड-१९ रुग्णांचे संक्रमण रोखण्याच्या अनुषंगाने पर्यटन स्थळांना भेटी देण्यास मनाई करण्यात आली होती. दरम्यान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्र. जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधित क्षेत्र वगळून उर्वरित बाहेरील क्षेत्रातील ‘पर्यटन स्थळे’ मार्गदर्शक सूचना आणि अटी व शर्तींच्या अधिन राहून खुली करण्यास परवानगी दिली आहे.

मार्गदर्शक सूचना

  • पर्यटन स्थळांना भेटी देणाऱ्या पर्यटकांना सामाजिक अंतर राखण्याबाबत संबंधित विभागामार्फत सूचित करण्यात यावे व रांग पद्धतीचा अवलंब करण्यात यावा. 
  • पर्यटन स्थळांच्या ठिकाणी सामाजिक अंतर राखण्यासाठी १ मीटर अंतरावर खुणा करून घेणे. 
  • पर्यटन स्थळांच्या ठिकाणी गर्दी होणार नाही यासाठीचे काटेकोरपणे नियोजन करावे. त्याकरिता स्वतंत्ररित्या एन्ट्री व एक्झिट पॉईंट स्थापन करावेत. 
  • पर्यटन स्थळांच्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची प्रवेशद्वाराजवळ सामाजिक अंतर राखून तपासणी करण्यात यावी. यामध्ये पर्यटकांचे तापमान, ऑक्सिजन पातळी इत्यादी तपासणी करण्यात यावी. 
  • पर्यटन स्थळांच्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचे नाव, पत्ता, वय, कोमॉर्बिडीटी, तापमान, एसपीओ२ व मागील १४ दिवसांच्या प्रवासाची माहिती याची नोंद रजिस्टरमध्ये करण्यात यावी. 
  • ज्या पर्यटकांचे तापमान ३८.० अंश सेल्सिअस किंवा १००.४ ष्टइ पेक्षा जास्त आहे व ऑक्सिजन पातळी ९५ पेक्षा कमी असेल अशा पर्यटकांना पर्यटन स्थळांवर जाण्यापासून प्रतिबंध करण्यात यावा. 
  • तापमान जास्त अथवा ऑक्सिजन पातळी कमी असल्यास संबंधित व्यक्तीस रूग्णालयामध्ये संदर्भित करावे. ज्या पर्यटकांना सर्दी, खोकला, ताप इत्यादी कोविड १९ सदृश लक्षणे असल्यास पर्यटन स्थळांवर जाण्यासाठी प्रतिबंध करण्यात यावे व दवाखान्यामध्ये संदर्भित करावे. 
  • पर्यटनस्थळाच्या ठिकाणावरील सर्व कर्मचारी, गाईड तसेच पर्यटक यांनी मास्क, ग्लोव्ज, फेस शिल्ड, सॅनिटायझर व सुरक्षा साधनांचा वापर करणे बंधनकारक असेल. 
  • सहली अथवा मोठ्या समूहांना पर्यटन स्थळाच्या ठिकाणी भेट देण्यास मनाई आहे. पर्यटन स्थळावर ज्या-ज्या ठिकाणी नागरिकांचा स्पर्श होण्याची शक्यता आहे अशी सर्व ठिकाणे वारंवार निर्जंतुक करणे बंधनकारक आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या