Belgaum News : सीमाभागात मराठी साहित्य महासंघाची स्थापना

अध्यक्षपदी अ‍ॅड. नागेश सातेरी, तर कार्याध्यक्षपदी गुणवंत पाटील यांची निवड

Belgaum News : कन्नडिगांचा जाच सोसत सीमाभागात दरवर्षी सळसळत्या उत्साहात होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनांच्या अडिअडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांना सहकार्य करण्यासाठी सीमाभागात मराठी साहित्य महासंघाची स्थापना करण्यात आली आहे. या महासंघाच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. नागेश सातेरी, तर कार्याध्यक्षपदी गुणवंत पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

सीमाभागात मराठी साहित्य व भाषा संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या विविध संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक बेळगाव येथे आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये महासंघाच्या स्थापनेचा निर्णय घेण्यात आला. तसेच यावेळी महासंघाच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. महासंघाच्या उपाध्यक्षपदी लक्ष्मणराव होनगेकर, कार्यवाहपदी बाबुराव गौंडाडकर, सहकार्यवाहपदी मधु पाटील, सदस्य म्हणून प्रा. आनंद मेणसे, एम. बी. गुरव, कृष्णा शहापूरकर, सी. वाय. पाटील, परशराम मोटराचे, अ‍ॅड. सुधीर चव्हाण यांची नेमणूक करण्यात आली आहे.

मराठी जतन - संवर्धनासाठी संमेलने 

सीमाभागात मराठी भाषेच्या जतन - संवर्धनासाठी दरवर्षी डिसेंबर ते मार्च या कालावधीत विविध ठिकाणी मराठी साहित्य संमेलनांचे आयोजन केले जाते. तथापि, या संमेलनांना अनेक अडचणी येत असतात. या अनुषंगाने या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. 

याव्यतिरिक्त सीमाभागात होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनांची रूपरेषा ठरवण्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच साहित्य संमेलनांचे स्वरूप, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कशा पध्दतीने साहित्य संमेलन भरवावे, कायदेशीररीत्या आवश्यक बाबींची पूर्तता करणे, साहित्य संमेलन भरवताना येणाऱ्या अडचणींवर कशा पध्दतीने तोडगा काढावा अशा अनेक गोष्टींवरही चर्चा करण्यात आली.

संमेलनांबाबत आज निवेदन देणार

सीमाभागातील मराठी साहित्य संमेलनांबाबत सोमवारी (दि. २८) बेळगाव येथे जिल्हाधिकाNयांना निवेदन सादर करण्यात येणार आहे. हा महासंघ सीमाभागात जी संमेलने होतात, त्यांच्यासाठी कार्यरत राहणार आहे. तसेच साहित्य संमेलनांना मदत करण्यासाठी महासंघ स्थापन करण्यात आला असल्याची माहिती गुणवंत पाटील यांनी दिली.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या