Belgaum News : सीमाभागातील मराठी साहित्य संमेलनांना परवानगी द्या

मराठी साहित्य महासंघाची बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

Belgaum News : सीमाभागातील बेळगाव तालुक्यासह खानापूर, चिकोडी, हुक्केरी तालुक्यांमध्ये सालाबादप्रमाणे मराठी साहित्य संमेलनांच्या आयोजनास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी मराठी साहित्य महासंघाने आज बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीस जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. नागेश सातेरी यांनी दिली.

अ‍ॅड. सातेरी यांच्या नेतृत्वाखाली महासंघाच्या शिष्टमंडळाने आज सकाळी जिल्हाधिकारी हिरेमठ यांची भेट घेऊन यासंबंधीचे निवेदन त्यांना सादर केले. त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला दिले. निवेदन सादर करतेवेळी अध्यक्ष अ‍ॅड. सातेरी यांच्यासह कार्याध्यक्ष गुणवंत पाटील, प्राचार्य आनंद मेणसे, मधू पाटील, सुधीर चव्हाण, एम. बी. गुरव, कृष्णा शहापूरकर, बी. जी. गौंडाडकर आदी उपस्थित होते.

अनेक वर्षांपासून संमेलनांचे आयोजन 

निवेदनात म्हटले आहे, की दरवर्षी डिसेंबर ते मार्च या कालावधीत बेळगाव तालुक्यातील कडोली उचगाव, बेळगुंदी, निलजी, कुद्रेमणी, सांबरा, खानापूर तालुक्यातील माचीगड, चिकोडी, शिट्टीहळ्ळी आणि हुक्केरी तालुक्यातील कारदगा येथे गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक लोकांकडून मराठी साहित्य संमेलने भरवली जातात. ही साहित्य संमेलने म्हणजे पूर्णपणे साहित्यावर आधारित कार्यक्रम आहे. एक दिवसाच्या या कार्यक्रमात लेखक, कवी, विचारवंतांसह कन्नड व उर्दूभाषिक साहित्यप्रेमी यांचा सहभाग असतो.

देशातील सध्याच्या परिस्थितीची जाणीव ठेवून आम्ही यंदाच्या साहित्य संमेलनांचा कालावधी कमी केला आहे. यावर्षीची मराठी साहित्य संमेलने दिवसभर न होता तीन तासांची होतील. त्याचप्रमाणे यावर्षी ग्रंथदिंडी, मिरवणूक, मंडप आणि साहित्य प्रेमींसाठी दुपारची भोजन व्यवस्था या सर्वांना फाटा देण्यात येणार आहे. संमेलन संबंधित गावातील योग्य जागी घेतले जाईल आणि पाहुणे मंडळीदेखील जवळच्या परिसरातील असतील. त्याचप्रमाणे कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे काटेकोर पालन केले जाईल. तेव्हा ही संमेलने भरवण्यास परवानगी दिली जावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.

संमेलनांना आडकाठी केली जावू नये 

निवेदन सादर केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना अ‍ॅड. सातेरी म्हणाले, मागील वर्षी मराठी साहित्य संमेलनाला परवानगी देण्यात प्रशासनाकडून काही प्रमाणात अडथळा आणण्यात आला होता. आता तर देशात कोरोना महामारीचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे कोरोनाचे निमित्त पुढे करून मराठी साहित्य संमेलनांच्या आयोजनास आडकाठी केली जावू नये यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. त्याचप्रमाणे दहा ते पंधरा दिवस अगोदर संमेलनाच्या संयोजकांना त्यांनी संमेलनाची तारीख निश्चित करून ती महासंघाला कळवावी असे आवाहन करण्यात आले आहे. 

आज जिल्हाधिकारी हिरेमठ यांनीदेखील साहित्य संमेलनाच्या तारखा घेऊन पुन्हा अर्ज करण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे संबंधित पोलीस ठाण्यांना कळवण्याचे आश्वासन दिले आहे, असे सांगून जिल्हाधिकाNयांची मराठी साहित्य संमेलनांच्या बाबतीतील आजची भूमिका सकारात्मक होती. त्यांनी आमची बाजू व्यवस्थित ऐवूâन घेतली. त्यामुळे यावेळची साहित्य संमेलने खंडित न होता मोठ्या प्रमाणात नसली तरी लहान प्रमाणात आम्ही यशस्वी करू असा विश्वास अ‍ॅड. सातेरी यांनी व्यक्त केला.

बेळगाव हे देशातील एकमेव उदाहरण

बेळगाव जिल्हा हा एकमेव असा जिल्हा आहे, की ज्या ठिकाणी दरवर्षी स्थानिक पातळीवर सोळा साहित्य संमेलने होतात. असे उदाहरण आज देशातील अन्य कोणत्याही जिल्ह्यात पहायला मिळत नाही. या साहित्य संमेलनांमुळे त्या त्या परिसरातील तरूणांना लेखनाची प्रेरणा मिळाली असून त्यांच्यापैकी आज काही लेखक, काही कवी, तर काही संयोजक बनले आहेत, अशी माहिती प्राचार्य आनंद मेणसे यांनी यावेळी दिली.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या