अखंड ध्यासातून केले स्वप्न साकार; मातृभूमीत राहून देशसेवा करणार
Inspiration News : भाईंदर (मुंबई) येथील फारुक इस्माईल कुरेशी यांच्या कन्या अफशा या नुकत्याच अमेरिकेतून पायलटचे प्रशिक्षण पूर्ण करून भारतात आल्या आहेत. अशी लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या अफशा या भारतातल्या मुस्लिम खाटीक समाजातील पहिल्या कन्या असल्याने देशभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
देशातल्या आणि विशेषत: राज्यातल्या मुस्लिम खाटीक, कसाई, कुरेश, कुरेशी बांधवांना अभिमान वाटेल अशी मोठी कामगिरी पायलट अफशा यांनी केली आहे. शालेय शिक्षणापासून उच्च शिक्षण मुंबईतच घेतलेल्या अफशा यांनी इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलिकम्युनिकेशनची पदवी उच्च श्रेणीत संपादन केली आहे. त्यानंतर त्यांनी कमर्शियल पायलट लायसेन्सचा अभ्यासक्रम अमेरिकेतून पूर्ण करून आपले पायलट बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. परदेशी नोकरीची संधी मिळत असतानाही मातृभूमीत राहून देशसेवा करण्याच्या ध्यासाने त्यांनी येथेच नोकरी करण्याची मानसिकता बाळगली आहे.
अफशा यांच्या देदिप्यमान यशाबद्दल त्यांचे, त्यांच्या परिवारातल्या सर्वांचे तसेच त्यांच्या सर्व शिक्षकांचे मुस्लिम खाटीक समाजाचे प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सादिक खाटीक (आटपाडी) यांनी अभिनंदन केले आहे. राज्यातील मुस्लिम खाटीक समाजातर्फे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते लवकरच अफशा यांचा सत्कार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
आत्मविश्वास, जिद्द असल्यास यश निश्चितअतिशय खडतर परिश्रमातून मिळालेल्या या देदिप्यमान यशात आईवडील, आजी, भाऊ, बहीण, अन्य नातलग आणि प्रोत्साहन देणारे गुरुजन यांचा जरी मोठा वाटा असला तरी वडिलांनी दाखविलेला प्रचंड विश्वास, दिलेले प्रोत्साहन आणि प्रेम मला या यशापर्यत नेण्यास उपयुक्त ठरल्याची प्रतिक्रिया अफशा यांनी दूरध्वनीवरून बोलताना दिली. प्रत्येक विद्याथ्र्यात सुफ्त गुण असतातच. प्रत्येकाने आत्मविश्वास, निष्ठा, परिश्रम, ध्येयाने प्रेरित होवून वाटचाल केल्यास प्रत्येकजण त्याच्या क्षेत्रात अव्वल कामगिरी करू शकतो. सकारात्मक भूमिका असेल आणि असेल त्या परिस्थितीतून जिद्दीने कष्ट घेतल्यास ते हमखास यशाचे मानकरी बनू शकतात असा संदेश अफशा यांनी सर्व विद्यार्थी - विद्यार्थिनींना दिला आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613


0 टिप्पण्या