Mahavitran News : लॉकडाऊनपासून भरमसाठ वीज बिलांचा दणका


महावितरणच्या भोंगळ कारभाराने वीज ग्राहकांची होतेय ससेहोलपट
 

Mahavitran News : लॉकडाऊन काळानंतर महावितरणकडून ग्राहकांना अव्वाच्या सव्वा विद्युत बिले येण्याचे प्रकार वाढले आहेत. मीटर तपासणीच्या नावाखाली महावितरणकडून नागरिकांची आर्थिक लुट सुरु आहे. तसेच वीज बिलाच्या चुकीमुळे नागरिकांची ससेहोलपट होत असून महावितरणच्या या भोंगळ कारभारामुळे वीज ग्राहक अक्षरश: वैतागले आहेत.

सातारा शहर व जिल्ह्यातील ग्राहकांना वाढीव वीज बिलाचा भुर्दंड सोसावा लागत आहे. गत महिन्याचे बील भरले असताना व अनावश्यक वापर नसतानाही अव्वाच्या सव्वा वीजबिल येत आहे. त्यामुळे ग्राहकांची महावितरण कार्यालयातील प्रत्येक महिन्याची वारी ठरलेली आहे. 

कमी युनिट जळाले तरी भरमसाठ बील येत असल्याने वीज वापरायची की नाही? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. जुने मीटर काढून जे नवीन मीटर बसवण्यात आले आहेत त्यातील ९० टक्के मीटर हे सदोष असल्याने त्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

तक्रारी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी 

याबाबत अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यास गेले असता तुमचा मीटर खराब झाला असून त्याची दुरुस्ती करुन घ्या, अशी उत्तरे दिली जात आहेत. शहर व उपनगरातील सर्वच भागांमध्ये अशा समस्या भेडसावू लागल्याने महावितरणच्या कार्यालयात तक्रारी करण्यासाठी गर्दी होत आहे.

चांगल्या मीटरची तपासणी करण्यासाठी २५० रुपये शुल्क घेतले जाते. अर्ज केल्यानंतर व पैसे भरल्यानंतरही येथील कर्मचारी दोन - तीन दिवसांनी येतात व मीटर घेऊन जातात. त्यानंतर याची तपासणी होऊन तो मीटर पुन्हा लावण्यास साधारणत: आठवड्याभराचा कालावधी लावतात. 

महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कोणाचाही अंकुश नसल्यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत असून सर्वसामान्य नागरिकांची दखल कोण घेणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या