Satara News : जिल्ह्यात संसर्गात घट, पण धोका अद्याप कायम


चोवीस तासात ७८ पॉझिटिव्ह; विहे येथील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
 

Satara News : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव घटत चालल्याची सूचिन्हे दिसत असल्याने जिल्हावासीय सुखावले आहेत. मात्र धोका अद्याप संपलेला नाही असा इशारा प्रशासनामार्फत वारंवार दिला जात आहे याची जाणीव ठेवण्याची गरज आहे. त्यादृष्टीने काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

जिल्ह्यात चोवीस तासात ७८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून केवळ एकजण दगावला आहे. तसेच आज दिवसभरात १०६ जणांना डिस्चार्ज मिळाला असून ३०५ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.

कोरोना बाधित अहवालामध्ये...

सातारा तालुका : सातारा २, देवी कॉलनी १, करंजे पेठ ३, शाहूपुरी १, विसावा नाका १, दौलतनगर सातारा २, कृष्णानगर १, एमआयडीसी सातारा १, सदरबझार २, जकातवाडी १, लिंब १, शिवथर १, रानमळा १, नागठाणे १, म्हसवे १, महागाव १.

कराड तालुका : कराड १, ओंड ७, आरेवाडी १, वडोली १, गोळेश्वर १, पाडळी १, ओगलेवाडी १, कोळे १.

पाटण तालुका : रासाटी १, कुसूर २.

फलटण तालुका : शिवाजीनगर १, पिंपळवाडी ३, साखरवाडी १, सुरवडी १, आसू १, होळ १, खराडेवाडी १.

खटाव तालुका : जाखणगाव २, वडूज २, पेडगाव १, कातर खटाव २, भुरकवाडी १, वाडी १.

माण तालुका : दहिवडी १, गोंदवले बुद्रुक २, राणंद १, थदाळे १, पळशी १, म्हसवड १, गंगोती १.

कोरेगाव तालुका : एकसळ १, पिंपोडे बुद्रुक १, पाडळी १.

जावली तालुका : सर्जापूर १, हुमगाव १.

खंडाळा तालुका : अंधोरी १, खंडाळा १.

महाबळेश्वर तालुका : पाचगणी २.

पाटण तालुक्यातील रूग्णाचा मृत्यू

खासगी हॉस्पिटलमध्ये विहे (ता. पाटण) येथील ७७ वर्षीय कोविड बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.

सातारा जिल्हा कोरोना

  • एकूण नमुने - २४९००९
  • एकूण बाधित - ५१२२५  
  • घरी सोडण्यात आलेले - ४८५८७  
  • मृत्यू - १७१९
  • उपचारार्थ रुग्ण - ९१९

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या