Satara News : अभिजित बिचुकले पुन्हा एकदा ‘चुकले’


मतदारयादीतच नाव नसल्याने दोन्हीकडचा उमेदवार मतदानाविना उपाशी
 

Satara News : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत दोन्ही जागा लढवण्यासाठी मैदानात उतरलेले 'बिग बॉस' फेम अभिजित बिचुकले पुन्हा एकदा 'चुकले'. मतदारयादीतच नाव नसल्याने उमेदवार असुनही त्यांना आज मतदान करता आले नाही. याचे खापर प्रशासनावर फोडून त्यांनी आपला संताप व्यक्त केलाही. पण त्यांनी मतदार नोंदणीसाठी अर्जच दाखल केला नसल्याचे सहायक निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी स्पष्ट केले आहे. 

विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान झाले. मात्र बिचुकले यांचे नाव मतदारयादीत नसल्याने त्यांना मतदान करता आले नाही. त्यामुळे बिचुकले यांनी हा प्रशासनाचा भोंगळ कारभार असल्याचा आरोप करत निवडणूक यंत्रणेवर याचे खापर फोडले. विविध वृत्त वाहिन्यांना बाईट देत त्यांनी बराच त्रागा केला. अर्थातच त्यामुळे मीडियाचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. उमेदवाराचेच नाव मतदारयादीत नसल्याने बातमी चालली. त्यामुळे प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेत मतदार नोंदणीच्या कागदपत्रांची तातडीने पडताळणी करून याबाबतचे स्पष्टीकरण दिले. त्यामुळे बिचुकले यांच्या कांगाव्यातील सत्य स्थितीवर प्रकाश पडला.

मतदार नोंदणीचा अर्जच दाखल नाही

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की अभिजीत वामनराव आवाडे - बिचुकले हे शिक्षक व पदवीधर या निवडणुकीसाठी उमेदवार असून पदवीधर मतदार संघाच्या मतपत्रिकेमध्ये अनुक्रमांक १४ वर व शिक्षक मतदार संघाच्या मतपत्रिकेमध्ये अनुक्रमांक ५ वर त्यांचे नाव नमूद आहे. त्यांनी विविध वृत्तवाहिन्यांवर दिलेल्या बाईटच्या अनुषंगाने तहसीलदार यांच्यामार्पâत पडताळणी केली असता कार्यालयातील शिक्षक, पदवीधर मतदार नोंदणीच्या प्राप्त अर्जांच्या पडताळणीअंती बिचुकले यांनी या कार्यालयास शिक्षक व पदवीधर मतदार नोंदणीकरिता अर्जच दाखल केलेला नाही. तसेच मुलाखतीमध्ये त्यांनी अर्ज सादर केलेला पुरावा त्यांच्याकडे असलेबाबत कोणताही उल्लेख केलेला नाही.

मुदतीत कोणतीही ‘हरकत’ नाही

शिक्षक व पदवीधर मतदार संघाची प्रारुप मतदार यादी २३ नाव्हेंबर २०१९ रोजी व अंतिम मतदार यादी ३० डिसेंबर २०१९ रोजी प्रसिद्धी करण्यात आलेली आहे. तसेच पुरवणी क्र. १ पुरवणी क्र. २ व पुरवणी क्र. ३ मुळ यादीसह मतदार यादी निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या प्रसिद्धी कार्यक्रमानुसार प्रसिद्धी करण्यात आलेली आहे. मतदार यादीवर हरकत घेण्याच्या कालावधीत बिचुकले यांनी कोणत्याही प्रकारची हरकत दाखल केलेली नसल्याचे दिसून येत आहे. 

यादी ही कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून तसेच मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयाच्या संकेतस्थळावरही सर्व मतदारांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे. मात्र मतदानाच्या दिवसापर्यंत त्यांनी मतदार यादीत नाव नसल्याबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार केलेली नाही. परंतु उमेदवाराचे नाव राज्य विधानसभेच्या मतदार यादीत असणे अनिवार्य आहे. त्यांच्या तक्रारीमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचेही शेखर सिंह म्हटले आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या