सातारा येथे आयोजन; १ कोटी २५ लाख रूपयांची वसुली
Satara News : सातारा जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोक अदालतीत ठेवण्यात आलेल्या ९ हजार ८३८ प्रकरणांमधील २२५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये १ कोटी २५ लाख २२ हजार रुपयांची वसुली करण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या लोकअदालतीचे ऑनलाईन नियोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र सावंत होते. यावेळी जिल्हा न्यायाधीश शरद पवार, प्रविण अभंग, सचिव तृप्ती जाधव, मुख्य न्यायदंडाधिकारी कस्तुरे, मुंबई आणि गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष अॅड. व्ही. ई. भोसले, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. अरुण खोत, जिल्हा सरकारी वकील अॅड. महेश कुलकर्णी उपस्थित होते.
९ हजार ९२९ प्रकरणे प्रलंबित
लोकअदालतीसाठी सिव्हील, जिल्हा परिषद यांच्यामार्फत सुरक्षा साधने पुरवण्यात आली होती. या लोक अदालतीमध्ये वादपूर्व ९८३८ प्रकरणे ठेवण्यात आली. त्यातील २२५ प्रकरणे निकाली निघाली असून त्यामार्फत सव्वा कोटींची वसुली झाली आहे. तर ९ हजार ९२९ प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. यामध्ये १२ कोटी १३ लाख ९० हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे.
मोटर अपघाताच्या १३७ प्रकरणांपैकी ९ प्रकरणे निकाली निघाली आहेत. यामध्ये नुकसान भरपाई म्हणून १२ लाख २३ हजार ३४८ रुपयांची रक्कम देण्यात आली. या लोक अदालतीसाठी एकूण ९ पॅनल करण्यात आले होते. लोक अदालत यशस्वी होण्याकरिता न्यायालयीन व्यवस्थापक, प्रबंधक, अधिक्षक, संगणक विभागातील कर्मचारी आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या