Satara News : ‘कास’साठी वाढीव ५७.९१ कोटींची तरतूद


धरणाची उंची वाढवण्याच्या रखडलेल्या कामाला गती मिळणार
 

Satara News : सातारा शहराच्या पश्चिम भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या कास धरणाची उंची वाढवण्याचे काम वाढीव निधी मिळत नसल्याने रखडले होते. आमदार शिवेंद्रराजे यांच्या पाठपुराव्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनात या कामासाठी वाढीव ५७.९१ कोटी निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे हे काम आता लवकरच मार्गी लागणार आहे.

सातारा शहरासह आसपासच्या १५ गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मिटण्यासाठी कास धरणाची उंची वाढवणे आवश्यक होते. त्यासाठी आमदार शिवेंद्रराजे यांनी आघाडीचे सरकार असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करुन कास धरणाची उंची वाढवण्याचे काम मंजूर करुन घेतले होते. 

त्याचवेळी राज्याच्या पाणीपुरवठा विभागाकडून निधीही उपलब्ध करुन घेण्यात आला होता. तसेच वन विभाग, हरित लवाद यासह अनेक विभागांच्या परवानग्याही त्यांच्या पाठपुराव्यातून मिळवण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली होती.

निधीअभावी रखडले होते काम 

सद्यस्थितीत प्रकल्पाचे काम ७५ ते ८० टक्के पूर्ण झाले आहे. मात्र वाढीव निधीची तरतूद न झाल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून पुढील काम रखडले होते. आता पुन्हा शिवेंद्रराजे यांच्या मागणीनुसार अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रकल्पासाठी वाढीव ५७.९१ कोटी रुपये निधीला मान्यता देण्यात आली होती. परंतु या निधीला राज्याच्या वित्त विभागाकडून प्रशासकीय मान्यता मिळणे आवश्यक होते.

तसेच प्रकल्पामुळे सातारा, कास ते बामणोली हा रस्ता बाधित झाला असून या रस्त्यावरील नवीन पुलालाही निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली होती. अजित पवार यांनी नवीन पुलासह कास धरण प्रकल्पासाठी वाढीव निधीस मान्यता देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या होत्या. त्यांच्या सूचनेनुसार वित्त विभागाने तत्काळ ५७.९१ कोटी रुपये निधीला प्रशासकीय मान्यता दिली होती. दरम्यान, या निधीची तरतूद होणे आवश्यक होते.

काम पूर्णत्वास जाण्याचा मार्ग मोकळा 

नुकत्याच झालेल्या दोन दिवसीय अधिवेशनात शिवेंद्रराजे यांनी अजित पवार यांची भेट घेवून याबाबत पत्र दिले. त्यानुसार पवार यांनी वाढीव निधीची तरतूद पाणीपुरवठा विभागातून केली आहे. यामुळे कास धरण प्रकल्पाचे रखडलेले काम लवकर सुरु होवून पूर्णत्वास जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नवीन पुलासाठी ३.५ कोटीची तरतूद

कास धरण उंची वाढवण्याच्या प्रकल्पामुळे सातारा, कास ते बामणोली हा रस्ता बाधित होत आहे. त्यामुळे या रस्त्यावर नवीन पुलासाठी ३.५ कोटी रुपये निधीची तरतूद अजित पवार यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामालाही आता गती मिळणार असून लवकरच दर्जेदार रस्ता दळणवळणासाठी उपलब्ध होणार आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या