Satara News : साताऱ्यात महा आवास अभियान कार्यशाळा


पात्र लाभार्थ्यांना घरे देऊन जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण करुया - बाळासाहेब पाटील

Satara News : महा आवास अभियान - ग्रामीण हे २८ फेब्रुवारी २०२१ अखेर राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत केंद्र व राज्य पुरस्कृत घरकुल योजनेंतर्गत गरजुंना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार घरे उपलब्ध करुन देण्यासाठी हे अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवून पात्र लाभार्थ्यांना घरे देऊन जिल्ह्याचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

सातारा जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृहात शुक्रवारी आयोजित महा आवास अभियान - ग्रामीण जिल्हास्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, समाज कल्याण सभापती कल्पना खाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अविनाश फडतरे आदी उपस्थित होते.

जमिनी खरेदीतील अडचणी सोडवा 

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आवास योजनांची कामे रखडली आहेत. या कामांना महा आवास अभियानांतर्गत गती द्यावी. शहर जवळ असलेल्या गावांमध्ये घरकुल योजनेंतर्गत जमिनी खरेदी करण्यास अडचणी येत आहेत. त्यावर मार्ग काढला पाहिजे. घरकुल योजना राबविण्यास अडचणी येत असतील तर त्या सर्व विभागांनी एकत्र बसून सोडविल्या पाहिजेत, असे पालकमंत्री पाटील यांनी कार्यशाळेत सांगितले. 

घरकुल योजना ग्रामीण भागात प्रभावीपणे राबविण्यासाठी नियोजन करा. यामध्ये सरपंच, पंचायत समिती सभापती, सदस्य यांचा समावेश करावा. मंजूर व अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न असून राज्य व केंद्र पुरस्कृत घरकुल योजना राबविण्यासाठी राज्य शासन पाठीशी आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

जिल्हा परिषदेच्या उपक्रमांना पाठबळ

घरकुले नसलेल्यांना २०२२ पर्यंत घरकुले देण्याचा शासनाचा मानस असून या कामाला प्राधान्य द्यावे. महा आवास अभियान - ग्रामीणमध्ये प्रत्येक गावच्या सरपंचांचा सहभाग घ्यावा. गरीब व गरजुला स्वत:चे घर झाले तर वेगळेच समाधान असते. यात अंमलबजावणी अधिकाऱ्यांचा मोलाचा सहभाग असला पाहिजे, असे शंभूराज देसाई यावेळी म्हणाले. जिल्हा परिषद राबवित असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना शासन पाठबळ देईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, सर्वांसाठी घर खूप महत्वाचे आहे. घरकुलांसाठी जमिनीबाबत तहसीलदारांसोबत गटविकास अधिकारी यांची बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावला जाईल. तसेच घरकुलांना लागणाऱ्या वाळूबाबत नियोजन करण्यात येईल. शासकीय योजनेतून बांधण्यात येणाऱ्या घरकुलांना गृह कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी बँकांनीही पुढाकार घ्यावा. यावेळी उदय कबुले, विनय गौडा यांचीही भाषणे झाली. 

प्रास्ताविकात अविनाश फडतरे यांनी अभियान कालावधीत करण्यात येणाऱ्या कामांची माहिती दिली. या कार्यशाळेत सर्व तालुक्यांचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, विविध बँकांचे प्रतिनिधी अन्य यंत्रणाचे प्रमुख आदी उपस्थित होते.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या