Satara News : जिल्ह्यात चारा घोटाळा; पुरावे घेण्यासही टाळाटाळ


तपासातील विलंबास जबाबदार कोण ? एकदा सोक्षमोक्ष लावा - संजय भोसले 

Satara News : जनावरांच्या चारा छावणीत माण - खटाव तालुक्यात बिले अदा करण्यात आलेल्या सहासष्ट कोटींच्या रकमेत घोटाळा झाला असून या अनुषंगाने तक्रारी दाखल केल्या आहेत. या प्रकरणांचा तपास सुरु आहे किंवा नाही याचा थांगपत्ता लागत नसून या तपासासाठी उपयुक्त असणारे आणि भ्रष्टाचार सिध्द करणारे पुरावे द्यायला तक्रारदार तयार असताना ते पुरावे घेण्यास जिल्हाधिकारी कार्यालयाची टाळाटाळ कशासाठी सुरु आहे ? तपास करण्यास केल्या जात असलेल्या विलंबास कोण जबाबदार आहे याचा एकदाचा सोक्षमोक्ष जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनीच लावावा, अशी सडेतोड मागणी शिवसेना जिल्हा उपप्रमुख संजय भोसले यांनी केली आहे.

सहासष्ट कोटींची बिले अदा करण्याकामी घेतलेल्या टक्केवारीची रक्कमदेखील कोटींच्या घरात असून याचा तपास होऊच नये असे वाटणारे जिल्हाधिकारी कार्यालयातील जबाबदार अधिकारी नेमके कोण व कानाला लागणारे कोण कोण आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांनी शोधणे गरजेचे आहे. कारण या प्रकरणाच्या तपासाला झालेल्या विलंबाचे मुख्य सूत्रधार देखील तेच बोलघेवडे आहेत, असा आरोप भोसले यांनी केला आहे.

... यासाठीच हात ओले केले का ?

अशांमुळेच भ्रष्टाचाराला खतपाणी मिळून तो बोकाळण्यास मदत झाली आहे. यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याबरोबरच छावणी चालक, संस्था मालक म्हणजेच राजकीय मंडळी यांना वाचविण्यासाठीच तथाकथित झारीतील शुक्राचार्यांचे हात ओले केले गेले आहेत काय याचादेखील तपास व्हायलाच हवा अशी मागणी भोसले यांनी केली आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांनी उशिरा का होईना आपल्याला सर्व पुराव्यांसहित व्हॉटस अ‍ॅप मेसेज करुन बोलावून घेणे हा त्यांचा डावपेच का असू नये. कारण न भेटताच जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी स्वत: फोनवरुन आपणास लेखी सूचित करता येत नसल्याचे म्हणजेच लेखी देऊ शकत नसल्याचे सांगितल्यावरुनच आपण पुरावे सादर न करणे उचित समजत, पुरावेजन्य माहिती लेखी पत्रांद्वारे त्यांच्या कार्यालयात दि. २३ डिसेंबर रोजी सादर केली असल्याचे त्यांनी सांगितले.

चौकशी करण्यास भाग पाडू

चारा छावणी व अवैध वाळू प्रकरणात पकडलेला ट्रक पकडला - सोडला आणि परत आणला या प्रकरणांबरोबरच भविष्यात संबंधित अधिकाऱ्यांनी गैरमार्गाने उभ्या केलेल्या पैशातून मिळविलेल्या मालमत्तांची सखोल चौकशी योग्य त्या संस्थांमार्फत करण्यास भाग पाडू असा इशारा भोसले यांनी दिला आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या