आदेश मोडून विजयी मिरवणूक काढल्याप्रकरणी ५२ जणांविरूध्द गुन्हा दाखल
Satara News : शिरवळ (ता. खंडाळा) येथील विशेष ग्रामसभेमध्ये शिरवळच्या सरपंच लक्ष्मी पानसरे यांच्याविरूध्दचा अविश्वास प्रस्ताव फेटाळल्यानंतर सातारचे जिल्हाधिकारी व शिरवळचे पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या आदेशाचा भंग करीत विजयी मिरवणूक काढल्याप्रकरणी सरपंच लक्ष्मी पानसरे यांच्यासह ५२ जणांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यासहित विविध कलमांखाली शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लक्ष्मी पानसरे यांच्याविरुद्ध ज्ञानसंवर्धिनी प्रशाला याठिकाणी अविश्वास प्रस्तावावरील मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. अविश्वास प्रस्ताव फेटाळल्यानंतर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी संपूर्ण जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या शस्त्र व जमावबंदी आदेशानुसार विजयी मिरवणूक न काढणेबाबत शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश हजारे सरपंच लक्ष्मी पानसरे यांना नोटीस बजावली होती.
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा
तरीही सरपंच लक्ष्मी पानसरे, भाजप ओबीसी मोर्चाचे राज्य सरचिटणीस अनुप सूर्यवंशी, शिवसेना माजी जिल्हा उपप्रमुख प्रदीप माने, भाजपचे माजी तालुकाप्रमुख राहुल हाडके, इम्रान उर्पâ पप्पू कलाम काझी, अजिंक्य उर्फ पप्पू अलबत कांबळे, शरद शंकर ताटे, भाजपचे शिरवळ शहराध्यक्ष नीळकंठ भुतकर, सागर पानसरे, समीर पानसरे, सारिका माने, ग्रामपंचायत सदस्या कविता माने, चंद्रकांत माने, चिराल चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य महेश जाधव, शुभम गुंजवटे, सनी टापरे, मुज्जमील रमजान उर्पâ मुन्ना शेख, अमोल पानसरे, दत्तप्रसाद राठी, उमाकांत राठी, बंडू भिसे यांच्यासह इतर २५ ते ३० जणांनी मिरवणूक काढून विजयाच्या घोषणा देऊन, फटाके फोडून गुलाल उधळत कोणत्याही प्रकारे सामाजिक अंतर न ठेवता सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिलेल्या आदेशाचा व पोलीस निरीक्षक उमेश हजारे यांनी बजावलेल्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी लक्ष्मी पानसरे यांच्यासह तब्बल ५२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू अहिरराव यांनी शिरवळ पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील पवार करीत आहेत.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या