कोडोलीतील चौघांविरुद्ध सातारा शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल
Satara News : वारसांची नावे कमी करत जमिनीची परस्पर विक्री केल्याप्रकरणी कोडोली येथील चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद अशोक संभाजी गायकवाड (रा. कोडोली, सातारा) यांनी नोंदवली आहे.
गायकवाड यांच्या आजोबांनी तसेच इतर नातेवाइकांनी सोसायटीचे कर्ज भागविण्यासाठी जमीन गहाण ठेवली होती. गहाणवटासाठीचा नोंदणीकृत दस्त त्यावेळी करण्यात आला होता. त्यानंतर अशोक गायकवाड यांच्या आजोबांच्या नावाची नोंद कमी करुन जमिनीची परस्पर विक्री केल्याचा तक्रारी अर्ज सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आला होता.
या अर्जाची चौकशी करुन दिलीप बाबू बनसोडे, संजय बाबू बनसोडे, लक्ष्मी अनिल गाडे, नंदकुमार विठ्ठल सुतार (रा. कोडोली) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज मछले करीत आहेत.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या