जिल्हा प्रशासनाच्या वतीने शिवप्रतापदिन साजरा; अवघा प्रतापगड शिवमय
Shivpratapdin News : कोरोना संसर्गाचे सावट असतानाही दरवर्षीप्रमाणे यावर्षीही छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, तुताNयांच्या रोमांच उभा करणाऱ्या आवाजात जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
आज सकाळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात प्रतापगडावरील आई भवानी मातेच्या मंदिरात मंत्रोच्चाराच्या गजरात षोडशोपचार पूजा बांधण्यात आली. या पूजेचे पौरोहित्य ओंमकार देशपांडे यांनी केले. त्यानंतर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते आई भवानीची मनोभावे आरती करण्यात आली.
भवानी मातेच्या मंदिरासमोरील ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करुन शिवशाहीचे प्रतीक असणाऱ्या भगव्या ध्वजाचे रोहण मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी संगिता चौगुले, महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा पाटील आदी उपस्थित होते.
क्षत्रीय कुलावतंस, राजाधिराज...
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असलेल्या मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करून या पालखीची मिरवणूक सुरु झाली. बालेकिल्ल्यातील शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याजवळ पालखीचे आगमन झाल्यावर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्प अर्पण करुन भक्तिभावे पूजन करण्यात आले.
यावेळी 'क्षत्रीय कुलावतंस, राजाधिराज...’ या ललकारीने, शिवरायांच्या जयजयकाराच्या घोषणांनी वातावरण भारुन गेले होते. त्या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजाचे पूजन करुन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते भगव्याचे ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर सातारा पोलीस दलाच्या बँड पथकाने विविध धून वाजवून मानवंदना दिली.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी शिवप्रताप दिन साध्या पद्धतीने व कमी लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येत असल्याचे सांगून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शिवप्रताप दिनाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613


0 टिप्पण्या