Satara News : जिल्ह्यात कोरोनाला उतार; पण ‘नव्या’चे टेन्शन


दिवसभरात १०८ नागरिक कोरोनामुक्त, तर ३१४ जणांचे नमुने पाठवले तपासणीला

जिल्ह्यात कोरोनाच्या बाबतीत काहीसे दिलासादायक चित्र असताना ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या व घातक विषाणूने धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे. हा नवा अवतार सध्याच्या विषाणूपेक्षा ७० टक्के अधिक धोकादायक असल्याचे सांगितले जात असल्याने सर्व जगाची झोप उडाली आहे. आजच ब्रिटनमधून देशात आलेल्या प्रवाशांपैकी आठजण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने सर्वांची चिंता वाढली आहे. सातारा जिल्ह्याने सप्टेंबरमध्ये कोरोनाचा रूद्रावतार पाहिला असल्यामुळे आता नवा विषाणू इकडे आला तर काय या काळजीने जिल्हावासीयांचे टेन्शन वाढले आहे. 

Satara News : सातारा जिल्ह्यात सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ४२ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर वाघोली येथील एका कोरोना बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

दरम्यान, आज दिवसभरात १०८ नागरिकांना घरी सोडण्यात आले असून क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथील १८, कराड १७, फलटण ३, कोरेगाव १०, वाई ३५, खंडाळा ६, रायगाव ७, पानमळेवाडी ९०, महाबळेश्वर १०, पाटण ३, दहिवडी २६, म्हसवड १४, तरडगाव १७ व कृष्णा मेडीकल कॉलेज, कराड येथील ५८ अशा एकूण ३१४ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.  

कोरोना बाधित अहवालामध्ये...

सातारा तालुका : सातारा ४, करंजे १, गोडोली १, दौलतनगर १, विकासनगर १, संभाजीनगर २, वाढे १, वेणेगाव १, लिंब १.

कराड तालुका : कराड १, बनवडी १, पोतले १, शेरे १.

पाटण तालुका : पाटण १.

फलटण तालुका : फलटण २, शुक्रवार पेठ १, भाडळी १, शिंदे वस्ती १, मुरुम १.

खटाव तालुका : निमसोड २, खातगुण १.

माण तालुका : दहिवडी १, म्हसवड १, गोंदवले १, पळशी ३, दिवड १, मलवडी १.

कोरेगाव तालुका : कोरेगाव ३.

जावली तालुका : कुडाळ १.

वाई तालुका : बावधन १.

खंडाळा तालुका : शिरवळ २, लोणंद १.

सातारा जिल्हा कोरोना

  • एकूण नमुने - २७६२१९
  • एकूण बाधित - ५४२००  
  • घरी सोडण्यात आलेले - ५१२२७  
  • मृत्यू - १७९४
  • उपचारार्थ रुग्ण - ११७९

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या